Gold Price News: सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करत होती. मात्र आज सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. सोन्याच्या दरासोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत. त्यामुळे अनमोल धातू खरेदी करण्याची हीच चोरण संधी निर्माण झाली आहे.
दिवाळीनंतर लग्नसराईचा मोसम सुरू झाला असून, लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंद वार्ता आहे. लग्नाची खरेदी करायची आहे आणि अशाच सोन्याचे दर घसरले तर त्या कुटुंबाला नक्कीच दिलासा मिळणार आहे. सोन्याच्या किमतीत झालेली घसरण पाहताच अनेक सराफ दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. चला तर मग जाणून घेऊया आज सोन्याची किमतीत किती घसरल झाली आहे आणि नवीन दर किती आहेत.
24 कॅरेट सोन्याचा दर
आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत सर्वाधिक घसरण झाली आहे. दहा तोळ्याच्या किमती मागे 19600 रुपयाची घसरण झाली आहे. गोल्ड रिटर्न्स च्या माहितीनुसार आज 24 कॅरेट च्या सोन्यात सर्वाधिक घट झाली आहे. आज एक तोळा सोनं 1960 रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवीन दर 1,25,080 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. काल या सोन्याचा दर 1,27,040 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता. त्याचबरोबर दहा तोळ्याच्या किमतीमध्ये 19600 रुपयाची घसरण झाली असून आज 12,50,800 रुपये एवढा दर आहे. सलग तिसऱ्या दिवशी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत झालेली घसरण पाहून बाजारात ग्राहकांची गर्दी झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
फक्त 24 कॅरेट सोन्याच्या दारात घसरण झाली नसून 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा दर 1800 रुपयांनी घसरला असून नवीन दर 1,14,650 रुपये प्रति तोळा एवढा आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट 10 तोळा सोन्याच्या किमतीत 18000 रुपयाची घसरण झाले असून नवीन दर 11,46,500 रुपये एवढे झाले आहेत. लग्नसराईत दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे या सोन्याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे.
18 कॅरेट सोन्याचा दर
24 आणि 22 कॅरेट सोने प्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट एक तोळा सोन्याचा दर 1470 रुपयांनी घसरला असून नवीन दर 93810 रुपये प्रति तोळा एवढा आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट 10 तोळा सोन्याचा दर तब्बल 14 हजार 700 रुपयांनी घसरला असून नवीन दर 9,38,100 रुपये एवढा आहे. स्वस्तात सुंदर डिझाईनचे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी 18 कॅरेट सोने योग्य ठरते.
चांदीच्या किमतीत देखील घसरण
सोन्याच्या किमती सोबत चांदीच्या किमती देखील आज घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत तब्बल 4,100 रुपयांनी घसरली आहे. नवीन चांदीचा दर 169 रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे. एक किलो चांदी आज 1,69,000 रुपये एवढी आहे. ज्या व्यक्ती चांदीचे दागिने खरेदी करायचे आहेत किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करायचे आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी वर्तवली जात आहे. Gold Price News
अनमोल धातूच्या किमतीत वाढती महागाई पाहता आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दिसू लागला आहे. मागील काही महिन्यापासून सोन्याचे दर आभाळाला भिडत होते मात्र आज झालेली घसरण पाहून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आजचा दिवस अनमोल धातू खरेदी करण्यासाठी चांगला आहे. भविष्यात सोन्याचे दर आणखीन घसरतील का यात वाढ होईल हे पाहण्यासारखे ठरणार आहे.