Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेची भर पडताना पाहायला मिळत आहे. परंतु अशातच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राच्या वातावरणासह इतर पंधरा राज्यात देखील मोठा इशारा दिलेला आहे. आज पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुणे, सातारा घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. Maharashtra Rain Update
राज्यात कुठे कुठे इशारा? ( Where is the weather department warning in the state)
हवामान खात्याच्या नवीन ताजा अपडेट नुसार, पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड तसंच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. Maharashtra Rain Update
तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव जाणवणार आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता भारतीय (IMD) हवामान खात्याने वर्तवली आहे. Maharashtra Rain Update
हे पण वाचा : 15 जून 2025 पासून पावसाचे रूप बदलणार: पंजाबराव डख यांचा अचूक हवामान अंदाज..
तसेच महाराष्ट्र सोबत देशभरातील इतर राज्यात देखील पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल आहे. उत्तर आणि पश्चिम भारतासह ईशान्य भारतातही असंच जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी देशातील किमान 15 राज्यात पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यांचा इशारा दिला असून, काही भागांमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमी वरती नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. तसेच पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला आणि ही बातमी नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद!
( टिप : वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित आहे. याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही स्थानिक इशारांसाठी IMD, च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. )
हे पण वाचा : राज्यात भयंकर वारे वाहणार, मुसळधार पावसासोबत राज्यावरती मोठे संकट! वाचा सविस्तर माहिती
