Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेले आणि सर्वाधिक चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत अनेक चर्चेंना उधाण आलेलं होतं. या महिन्याचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आता कधी मिळणार महिलांमधून याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. परंतु ज्या महिला या योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महिलांना दोन्ही योजनेचे एकत्रित हप्ते मिळणार खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार ? परंतु हे खरे आहे का याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती दिली याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Ladki Bahin Yojana News
लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी जमा होणार?
सर्वात महत्त्वाची आणि लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै आणि ऑगस्ट हफ्त्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची उत्सुकता आणि काहीशी चिंता दोन्ही कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये स्वरूपात दिले जाण्याची शक्यता आहे. हप्ता उशिरा येणे मागचे काही कारण देखील आहेत स्वतंत्र दिनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याच सूत्रांचा म्हणणं आहे. रक्षाबंधनापूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे महिलांनी या गोष्टीवरती विश्वास न ठेवता अधिकृत जाहीरनामाची वाट पाहावी.
E -KYC मुळे अपात्र लाभार्थी वगळले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील केवायसी प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केल आहे. योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पडताळणी कर्ण तातडीने शक्य नव्हत. मात्र त्यानंतर सरकारने सर्व लाभार्थ्यांची सविस्तर छाननी सुरू केली. नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना e -KYC पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनेक संधीही देण्यात आल्या.
राज्यातील तब्बल 1 कोटी 65 लाख महिलांनी आतापर्यंत e -KYC यशस्वीरित्या पूर्ण केली असून, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आल आहे. या पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत असल्याचाही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.
ज्या महिलांनी अद्याप केव्हाशी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घेणे गरजेचे आहे अन्यथा हप्ता मिळू शकत नाही. त्या महिलांनी केवाशी प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे त्यांना रक्षाबंधना किंवा त्याआधी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणासाठी वाट पाहावी.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..
