Mukhymantri Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आली तसेच सरकारने घेतलेल्या पावसाळी अधिवेशन मध्ये मंजूर दिलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. परंतु ही रक्कम कोणत्या महिलांना मिळणार हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मध्यंतरी काही महिलांनी अर्ज भरले नव्हते. त्या महिलांना मुदतवाढ देऊन अर्ज करण्यासाठी वेळ दिला होता. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्या महिलांना सरकारने तिन्ही हप्त्याचे मिळून ₹4500 रुपये जमा केलेले आहेत. परंतु काही महिलांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत. सरकारचा नवीन नियम काय सांगतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत. Mukhymantri Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसरे हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती येऊ लागलेले आहेत. दुसरा हप्ता जमा झाल्यावर महिलांच्या खात्यावरती तिसरे हप्त्याचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला होता. महिलांच्या खात्यावरती सरकारने घेतलेल्या एका कार्यक्रमांमध्ये पैसे वितरित केलेले आहेत. 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केलेले आहेत.
याच महिलांच्या खात्यावरती येणार 4 हजार 500 रुपये
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांना यापूर्वी दोन हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांनी ऑगस्टनंतर अर्ज केले आहेत. अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या खात्यामध्ये फक्त दीड हजार रुपये जमा झाले असतील तर तुम्ही यापूर्वी दोन हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे असं ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुमच्या खात्यावरती एकही रुपया जमा झाला नाही तर तुम्हाला तुमच्या बँक खाते आधार लिंक आहे का हे देखील चेक करणे गरजेचे आहे. तरच तुमच्या खात्यावरती सरकारांतर्गत हा लाभ जमा होणार आहे.
सरकारचा नवीन नियम
सरकारच्या नवीन नियमानुसार 1 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेसाठी जर अर्ज केले असेल तर त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून लाभ मिळणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत असे मिळून 4500 रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र एक सप्टेंबर पूर्वी अर्ज करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैशा जमा झाले नाहीत. अर्ज मंजूर होऊ नये या महिलांना लाभ मिळाला नाही. याच्या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचे आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे अर्जातील इतर त्रुटीमुळे देखील महिलांना लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दूर केल्यास महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.