Astrology Today : ज्योतिष शास्त्र मध्ये सूर्य ग्रहांचा राजा तर बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. या दोघांची युती जेव्हा एकत्र येते ती फक्त ग्रहांची नव्हे तर नशीब बदलणारी ठरते. येत्या जानेवारी 2026 मध्ये असाच एक राजयोग बनणार आहे बुधादित्य राजयोग. या युगाचा प्रभाव विशेषता मेष, वृषभ आणि मीन राशींच्या व्यक्तींवर होणार असून, या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा शुभ ठरणार आहे.
जानेवारीमध्ये सूर्य १४ तारखेला आणि बुध 17 तारखेला मकर राशीत प्रवेश करतील. या दोघांचे युतीमुळे मकर राशीत बुधदीत्य राजयोग तयार होणार आहे. हा योग तीन फेब्रुवारी 2026 पर्यंत टिकेल आणि या काळात या तीन राशींच्या आयुष्यात प्रगती, पैसा, मानसमान मिळणार आहे.
मेष राशी : मेष राशींच्या लोकांसाठी हा काळा अतिशय शुभ मानला जातो. कारण या राजीवगाचा प्रभावामुळे घरात सुख शांती राहील, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. करियर आणि व्यवसायात नवी दिशा मिळू शकते. दीर्घकाळ अडकलेले प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीची नवे दार उघडतील, तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतन वाढच आनंद मिळू शकतो. ज्यांना घर किंवा वाहन घेण्याचा स्वप्न होतं त्यांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं.
वृषभ राशी: वृषभ राशीसाठी हा राजयोग म्हणजे जणू भाग्याची चावीच मिळाल्यासारखा आहे. या काळात प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार. आर्थिक स्थिती सुधारेल, भौतिक सुखसोई वाढतील. विद्यार्थी विदेशामध्ये उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत असतील तर त्यांना संधी मिळू शकते. कुठल्याही धार्मिक किंवा शुभकार्यात सहभागी होण्याचा योग आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल, लोकांचा मन संबंध मिळेल आणि मातेशी संबंध अधिक गोड होतील.
मीन राशी: मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात फायदेशीर ठरणार आहे. या राज योगाच्या प्रभावामुळे भाग्योदय होईल. नवीन उत्पन्नाचे मार्गे खुले होतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या लोकांना मोठे पद मिळू शकते. अडकलेले कामे मार्गे लागतील, आर्थिक फायद्याचे निर्णय होतील. गुंतवणूक केलेली रक्कम उत्तम परतावा देईल. प्रतिष्ठा, मानसन्मान आणि आत्मविश्वास या सगळ्यात प्रचंड वाढ होईल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.) Astrology Today
