Baba Venga Gold News | दिवाळीचा सण आज पाडव्याचा दिवस याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा ही बातमी वाचा नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. कारण भविष्य व्यक्त करणारा बाबा वेगानं त्यांनी त्यांच्या भविष्या मध्ये सोन्याबाबत मोठा भाकीत व्यक्त केलेल आहे. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती Baba Venga Gold News
सध्या दिवाळीचा मोठा सण आणि लोक आनंदामध्ये हा सण साजरा करत आहेत, सगळीकडे आनंदाचे उत्सव पाहायला मिळत आहे. घरोघरी फराळाची सुरुवात झालेली आहे नवीन कपडे नवीन दागिने यांची सुद्धा खरेदी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि आज पाडव्याचा दिवस तर या मुहूर्तावरती अनेकांनी चांदी दागिने खरेदी केले असतील. तर काही लोकांनी गुंतवणुकीसाठी देखील सोने खरेदी केले असतील. जर तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज ही तुमच्यासाठी कामाची बातमी ठरणार आहे.
आज आपण पुढील वर्षी सोन्याची किंमत किती रुपये पर्यंत वाढू शकते याबाबत बाबा वेंगा यांचे भाकित काय सांगते याविषयी माहिती पाहणार आहोत. खर तर सध्या सोन्याचा बाजारभावाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये दर वाढलेले आहेत आणि ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. सोन्याची किंमत जवळपास एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा अशी झाली आहे.
यावर्षीची सोन्यातील वाढ पाहता अनेकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता यापुढे आम्हाला सोन खरेदी करणे खूपच कठीण होणार आहे कारण सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोन्यामध्ये वाढ का झाली तर यामध्ये अनेक कारण आहेत, जागतिक अनिश्चिता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ETF मधील गुंतवणूक या सर्व गोष्टींमुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं तज्ञांचे म्हणणं आहे.
सोन्याच्या भावावर वेगवेगळे घटक परिणाम करतात जागतिक राजकारण, डॉलरची ताकद आणि अर्थव्यवस्था यावरती अवलंबून असते. यावर्षी देखील भूराजकीय तणाव, अमेरिकेचे कर धोरण आणि इतर काही अनिश्चित परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.
यात परिस्थितीवर काही वर्षांपूर्वी व्यक्त केलेली बाबा वेंगा ची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये सोन्याला काय भाव मिळाल्याबाबत भाकित सांगितलेला आहे, पुढील वर्षी जागतिक आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे चलन व्यवस्थेत व्यत्य, बँकिंग संकट आणि बाजारातील चढउतार निर्माण होईल असे सांगितले जाते.
यामुळे पुढील वर्षी सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होईल असं बाबा वेगानं म्हणणं आहे. आर्थिक अस्थिरते पासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी बहुतांश लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. पुढील वर्षात देखील आर्थिक संकट उभे राहणार आणि त्यामुळे थोड्याच आणखी गुंतवणूक वाढणार यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ होईल अशी शक्यता वर्तवली आहे. पुढच्या वर्षी आणखी 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होईल असं देखील वर्तवला जात आहे. म्हणजे पुढील वर्षी सोना एक लाख 60 हजार ते एक लाख 80 हजारच्या आसपास जाईल असा आहे.
हे पण वाचा | आजचं राशिभविष्य ! तुमच्या राशीसाठी येणाऱ्या २४ तासांत होणारं आश्चर्यकारक भविष्य काय आहे
