Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जात आहे. या योजनेच्या लाभांमुळे अनेक कुटुंबियांना घर खर्च भागवण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून ई केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. पण आता सरकारने या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लावला असून महिलांना मोठा दिलासा दिला आहे. Ladki Bahin Yojana
मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करताना शासनाने ई केवायसी करणे अनिवार्य केले होते. मात्र या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, सर्वर डाऊन आधार पडताळणीतील त्रुटी आणि बँक लिंक च्या अडथळ्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना ही प्रक्रिया करणे अवघड जात होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने ई केवायसी प्रक्रिया सध्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जिल्ह्यात महिलांना केवायसी साठी रांगा लावाव्या लागत होत्या. काहींना केंद्रावरून परतही जावे लागत असे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत चालली होती. सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार महिलांच्या नाराजीचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे महिलांच्या हिताचा आणि सोयीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. दिवाळीचा सण नुकताच पार पडला आहे आणि अनेक महिलांसाठी दिवाळीनंतर मिळणारा हा लाभ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कर खर्च मुलांचे शिक्षण वीज बिल किराणे अशा अनेक जीवनावश्यक गरजांसाठी महिलांनाही रक्कम अत्यंत महत्त्वाची ठरते. गेल्या काही दिवसापासून अनेक लाभार्थी महिलांना एकच प्रश्न पडत होता तो म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? शेवटी शासनाकडून संकेत मिळाले आहेत की पुढच्या आठवड्यात या महिन्याचा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. या बातमीनंतर लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
एवढ्या महिलांना मिळणार लाभ?
28 जून 2024 रोजी या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आणि एक जुलैपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती या कालावधी तब्बल 2 कोटी 56 लाख महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शासनाने त्यांच्या निकषानुसार पडताळणी करून त्यात 45 लाख महिलांना अपात्र केले. सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशाप्रकारे राज्यातील सुमारे 70 लाख महिला अपात्र ठरू शकतात मात्र पात्र लाभार्थ्यांना चिंता करायची गरज नाही. त्यांचा हप्ता वेळेवर मिळणार आहे. असं अधिकाऱ्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने आर्थिक धैर्य देणारी ठरत आहे. अनेक महिलांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळाल्यामुळे किराणा विज बिल शालेय खर्च सहज भागवता येतो. ही योजना आमच्यासाठी खरंच खूप मदतीची ठरत आहे. मात्र ई केवायसी च्या या प्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आता सरकारने प्रक्रिया थांबवल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हसू दिसत आहे. सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल अशा अपेक्षा आहे.
