पीएम किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय..! 21 व्या हप्त्याचे ₹2,000 या तारखेला मिळणार? पहा सविस्तर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, या देशाचा कना शेतकऱ्यांना मानले जाते. पण याच शेतकऱ्यावर गेल्या काही वर्षात महागाई, पावस, हमीभाव अशा अनेक संकटाची डोंगर कोसळत आहेत. अशावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला जातो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान 21 व्या हप्त्याबाबत एक आनंद वार्ता समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केंद्र सरकारकडून हा निधी कधीही वितरित केला जाऊ शकतो. मात्र अद्याप याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र प्रशासकीय हालचालीवरून 21 वा हप्ता जमा होण्यास जास्त विलंब होणार नाही असा अंदाज वर्तवला जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 11 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत थेट लाभ दिला आहे.

दरम्यान पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर महत्त्वाचा हा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सरकारकडून ई केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कारण अनेक ठिकाणी या योजनेचा गैरवापर करून फसवणुकीचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्यांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून आधार ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नाही त्यांनी जवळील सीएससी केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये केली जात होती. मात्र काही प्रशासनिक कारणांमुळे तो नोव्हेंबरच्या सुरुवातीला वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होतात रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आज देशभरातील शेतकरी या योजनेच्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. काहींसाठी ही रक्कम खतं खरेदी करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. काही भागांमध्ये खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाले आहे. अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा खर्च भागवण्यासाठी या योजनेच्या हप्त्याचा हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांसाठी हा हप्ता आर्थिक आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे. मोदी सरकारचा हा उपक्रम शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. Beneficiary Status

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment