BSF Bharti 2025 : देशाची सुरक्षा करणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF मध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बीएसएफ मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ही संधी फार काळासाठी नाही कारण या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होणार आहे त्यामुळे आजच अर्ज आपला अर्ज भरून घ्यावा.
ही भरती स्पोर्ट्स कोटा अंतर्गत केली जाणार आहे. म्हणजेच खेळाच्या मैदानावर चमक दाखवलेल्या युवक युवतींना आता थेट सीमा सुरक्षित काम करण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून बीएसएफ मध्ये एकूण 351 जागा भरल्या जाणार आहेत त्यापैकी 197 पत पुरुषांसाठी आणि 194 पद महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण असावा. मात्र हे लक्षात घ्या की ही स्पोर्ट कोठे अंतर्गत भरती आहे त्यामुळे उमेदवाराने राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असावा.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे. वयाची गणना १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आधारावर केली जाईल राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार सूट दिली जाणार आहे.
उंची किती पाहिजे ?
पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 170 सेमी, महिला उमेदवारांसाठी 157 सेमी उंची आवश्यक आहे.
अर्ज फी :
महिला, SC,ST, उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे परंतु जनरल आणि ओबीसी पुरुषांसाठी 159 रुपये शुल्क भरावे लागेल
पगार आणि सुविधा :
निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 3 पे स्केलनुसार 21700 ते 69 हजार 100 पर्यंत वेतन मिळणार आहे. याशिवाय बीएसएफ चे सर्व शासकीय भत्ते आणि सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
अर्ज कसा करावा :
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी या https://rectt.bsf.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी आणि आपली अर्ज प्रक्रिया ऑनलाईन भरून घ्यावी.
विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या भरतीकरिता तुम्हाला 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे म्हणजेच आता शेवटचे दोन दिवस उरले आहे. तरीपणच्या उमेदवारांनी या भरती करिता अर्ज केले नाही अशा उमेदवारांसाठी अजून देखील 48 घंटे उपलब्ध आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यावा.
