Cibil Score: सिबिल स्कोर हा आर्थिक व्यवहारासाठी अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. तुम्हाला एखाद्या बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी व भविष्यात नवीन क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. मध्यंतरी तर एक बातमी आली होती की लग्नासाठी देखील सिबिल स्कोर तपासला जाणार. त्यामुळे आता प्रत्येकाचा सिबिल स्कोर चांगला असणे अतिशय आवश्यक बनले आहे. तुमचा सिबिल स्कोर किती आहे? त्याचबरोबर तुमचा सिबिल स्कोर कसा चांगला ठेवता येईल याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिस योजना, 5 लाख रुपये गुंतवणूक करा व मिळवा 15 लाख रुपये! हि योजना बनवणार श्रीमंत
भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात कर्ज घेण्यासाठी सिविल स्कोर अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. तुम्ही तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही कशी करता यावर तुमचा सिबिल स्कोर ठरवला जातो. तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी कर्ज आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर केले जातील याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असूनही अनेक वेळा सिबिल स्कोर कमी होतो. क्रेडिट कार्ड च्या मर्यादा पेक्षा फक्त 30 टक्के रक्कम वापरली पाहिजे. म्हणजे एक लाख लिमिट असेल तर फक्त तीस हजार रुपये खर्च केला पाहिजे. क्रेडिट लिमिट वापर 70% पेक्षा जास्त असल्यास क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो.
तुमचे उत्पन्न स्थिर असल्यास आणि पेमेंट इतिहास चांगला असल्यास तुम्ही तुमच्या बँकेला पेमेंट मर्यादा वाढवून देण्याची विनंती करू शकता. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्या बिलांना दोन-तीन क्रेडिट कार्ड मध्ये विभाजित करा. यामुळे एका कार्डाच्या वापराचे प्रमाण वाढणार नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोर कमी होणार नाही. तुमच्या क्रेडिट कार्डला मोबाईल ॲप किंवा एसएमएस अलर्ट सेव ठेवा. यामुळे तुमचा खर्च 30% च्या वर गेल्यास तुम्हाला अलर्ट मेसेज येईल.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
वारंवार मर्यादा ओलांडल्याने बँका तुम्हाला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ समजतात. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम कर्ज किंवा नवीन कर्जासाठी अर्ज नाकारला जाऊ शकतो. सिबिल स्कोर घसरल्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे तुम्हाला आणखीन कठीण जाऊ शकते. जरी तुम्ही सध्या सर्व पेमेंट वेळेवर करत असाल पण तुमचा जुना रेकॉर्ड चांगला नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर पुढील सात वर्षापर्यंत दिसून येतो.
तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड करा. एकावेळी एकापेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा. एक कर्ज पूर्ण फेटल्यानंतरच दुसरे कर्ज घ्या. क्रेडिट कार्ड च मर्यादा ठरवा. वेळोवेळी तुमचा सिबिल स्कोर किती आहे याचा तपशील घेत रहा. जेणेकरून तुमच्या सिबिल स्कोर वर निगेटिव्ह परिणाम होतात का पॉझिटिव्ह हे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने तुम्ही सिबिल स्कोर मेंटेन ठेवू शकता. Cibil Score
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी नेमकं काय करावे? तुमचा सिबिल स्कोर किती आहे? वाचा सविस्तर..”