compensation for damages | नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यात 25 आणि 26 जून रोजी मुसलधार पाऊस झाला होता या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने आता बुलढाणा जिल्ह्यातील आठ मंडळ मधील 87 हजार 390 पॉईंट दोन हेक्टर क्षेत्रामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसान भरपाई चे सर्व पंचनामे करून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठ पुरवठा केला आहे व या पाठपुरावाला यश देखील आले आहे.compensation for damages
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
बुलढाणा जिल्ह्यातील 90383 शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ दिला जाणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना आता आधार मिळणार आहे, या नुकसान भरपाईचा आढावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतला आहे व शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्यात यांना यश देखील आले आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
त्याचबरोबर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे नुकसानी बापाची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती केली होती. या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी असे देखील निवेदन दिले आहे.
सरकारने दिनांक 6 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 74 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मंजूर केली आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघातील सरासरी ११२ मीमी पावसाची नोंद झाली होती यामध्ये मेकर मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई :
सिंदखेड राजा या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ही 3478 इतके आहे, या शेतकऱ्यांच्या एकूण 3128 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना सरकारकडून दोन कोटी 74 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. यानंतर लोणार तालुक्यातील 18 हजार 739 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून 15 कोटी 84 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. मेहकर तालुक्यातील ६८ हजार ५८ शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली असून या शेतकऱ्यांना 55 कोटी 77 लाख रुपये मंजूर झाले आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
यानंतर खामगाव तालुक्यातील नुकसान झालेली शेतकऱ्यांची संख्याही 98 इतकी आहे या शेतकऱ्यांना दहा लाख 62 हजार रुपयांचा नुकसान भरपाई रक्कम देण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील दहा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झाली आहे. असे एकूण 90 हजार 383 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वरील दिलेली माहितीही प्रसार माध्यमाच्या आधारावरून घेतलेली असते
