Digital Ration Card: आजकाल प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणत्याही शासकीय कार्यासाठी रेशन कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. दोन वर्षांपूर्वी एकदा मी गावच्या रेशन दुकानात गेले होते आणि चुकीच्या दिवशी गेले म्हणून रिकाम्या हाताने परतले. दुसऱ्या दिवशी रेशन कार्डच घरी विसरलं आणि पुन्हा अन्नधान्य मिळालं नाही. “कधी कधी वाटायचं, एवढं सगळं तंत्रज्ञान आहे, तरी आपलं रेशन कार्ड का बघायला लागतंय? पण आता काळ बदलतोय. कारण रेशन कार्डसारखा महत्त्वाचे कागदपत्रे डिजिटल झालाय आणि तोसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये! भारत सरकारने सुरु केलेल्या ‘Mera Ration 2.0’ या नव्या अॅपमुळे आता रेशन कार्ड घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. फक्त तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून तुम्ही लॉगिन करू शकता आणि लगेच तुमचं डिजिटल रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल.
मोबाईलवरचं हे कार्ड दुकानदाराला दाखवलं, की सहज अन्नधान्य मिळू शकतं. त्यातही फक्त कार्डच नाही, तर घरातील सदस्यांची माहिती, रेशन दुकानाचा पत्ता, महिन्याचं कोटा किती उरलंय आणि किती घेतलं हे सगळं काही एका ठिकाणी मिळतं. हे खरंच ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी, वयोवृद्धांसाठी आणि रांगेत तासंतास थांबणाऱ्या महिलांसाठी फार मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. आज गावागावात इंटरनेट पोहचलंय, मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलाय, पण अजूनही सरकारी कामासाठी लागणारे दस्तऐवज हरवल्यास किंवा विसरल्यानं सामान्य माणूस उगाच हेलपाटे खातो. आता मात्र या अॅपमुळे अनेक अडचणी टळणार आहेत.
हे पण वाचा | राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
डिजिटल रेशन कार्डचं महत्त्व काय?
रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्यासाठीच नसलं, तरी त्याचा उपयोग पासपोर्टपासून ते शाळा-कॉलेज प्रवेश, बँकेत खाते उघडणं, गॅस कनेक्शन घेणं, वृद्धापकाळ निवृत्ती योजना, अगदी काही वेळा आधार अपडेटसाठीही होतो. म्हणजेच हे एक असा दस्तऐवज आहे जो आपलं अस्तित्व सिद्ध करतो. आता कल्पना करा, हा दस्तऐवजच तुमच्या मोबाईलमध्ये असला, तर काय सोय होईल? बँकेत जाताना, सरकारी कार्यालयात जाताना किंवा कुठेही ओळख सांगायची वेळ आली तर, ‘Mera Ration 2.0’ मध्ये फक्त एक क्लिक, आणि माहिती तुमच्या हातात. Digital Ration Card
हे पण वाचा | सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल! आज 19 मे ला 10 ग्रॅम सोनं किती रुपयाला मिळते? पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर…
जर तुमच्याकडे अजून रेशन कार्ड नसेल, तर काय कराल?
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://rcms.mahafood.gov.in किंवा आपले सरकार पोर्टलवर जाऊन तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. मोबाईलवरच फोटो काढून अपलोड करता येतो, अर्जाची स्थिती पाहता येते आणि काही शंका असल्यास हेल्पलाइन नंबरही उपलब्ध असतो.एक गोष्ट इथे आवर्जून सांगायला हवी सरकार आता डिजिटल भारत घडवते आहे, पण तो खराखुरा डिजिटल भारत तयार होण्यासाठी आपल्यालाही पुढे यावं लागेल. आज जर आपण मोबाईलवर बँकिंग करतो, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो, तर सरकारी सेवा वापरणं का नाही जमणार?
डिजिटल रेशन कार्ड च्या सुविधेमुळे आता तुम्हाला रेशन कार्ड घेऊन रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. आता तुम्ही मोबाईलमधून कार्ड दाखवतात आणि पाच मिनिटांत अन्नधान्य घेऊन घरी परततात. रांगा नाहीत, भांडणं नाहीत, कागदपत्रांची भीती नाही. डिजिटल युगात शेतकऱ्यांचा वेळ वाचतोय, गृहिणींचं श्रम कमी होतंय आणि सरकारी योजनांचं पारदर्शक वितरण सुनिश्चित होतंय. आज आपण गावाकडं, शहरात, अगदी आदिवासी भागातही मोबाईलवरून सरकारी सेवा घेऊ शकतो . हीच खरी भारताची डिजिटल क्रांती आहे. आणि ही क्रांती आपल्या खिशातल्या मोबाईलमधून सुरु होते!
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा