राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल पुढील पाच दिवस अलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

weather today :- राज्यात अजून मान्सून आला नाही, पण पावसाने मात्र आधीच धडक मारायला सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात वाऱ्याचं चक्र फिरू लागलंय, आणि त्याचा परिणाम थेट आपल्या महाराष्ट्रावर जाणवू लागलाय. एकीकडे उन्हाचा तडाखा अजून ओसरलेला नाही, आणि दुसरीकडे मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाच्या संततधारांनी जनजीवन विस्कळीत होऊ लागलंय.weather today

हे पण वाचा  :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

हवामान विभागाचा इशारा स्पष्ट आहे –

पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र वादळी पावसाच्या विळख्यात राहणार. कोकण, मध्य महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’, तर पश्चिम भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर याठिकाणी जोरदार सरी कोसळणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरीसुद्धा या संकटातून सुटणार नाहीत.

विजांच्या गडगडाटात आणि तुफानी वाऱ्यांत घरं-दुकानं हलायला लागलीत. अनेक ठिकाणी फळझाडांची फांदी मोडली, कांदा-टोमॅटोच्या झाडांवर पाणी साचल्याने नुकसान सुरू झालंय. एकीकडे महागाईने खिशाला कात्री लागलीय आणि दुसरीकडे ही निसर्गाची अवकाळी मार. शेतकऱ्याचं मन कितीवेळा तुटायचं?

हे पण वाचा  :– 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आज पासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, २१ मेपर्यंत पावसाचा जोर वाढत जाणार आहे. सध्या गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला पूरक वातावरण तयार झालंय.

हे वातावरण केवळ निसर्गाचं नाही, तर शेतकऱ्याच्या अंतर्मनात चाललेली कळकळही व्यक्त करतंय. फळबागा, भाजीपाला, कांदा, डाळिंब, द्राक्षासारख्या पीकांचे नुकसान हे फक्त उत्पादनात घट नाही, तर कष्टाच्या तुटलेल्या आशा आहेत.शहरांमध्ये लोक घरात थांबून वीज गेल्याची चर्चा करतायत, पण गावाकडं शेतात पाणी साचलंय, जनावरं कुडकुडतायत आणि शेतकरी रात्र रात्र ढगांकडं पाहतोय काहीतरी वाचवता येईल का, याच्या आशेनं.

  अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल पुढील पाच दिवस अलर्ट”

Leave a Comment