EPFO Updates 2025 :- EPFO नियमांमध्ये आता नवीन बदल करण्यात आले ! आता घरबसल्या होणार की 5 कामे EPFO धारकांसाठी एक नवीन बातमी समोर आली आहे, देशभरातल्या कोट्यवधी कामगार, नोकरदार, पेन्शनधारक यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) असे काही बदल केले आहेत, जे त्यांच्या रोजच्या आर्थिक जगण्यात थेट परिणाम करणार आहेत. पीएफ ट्रान्सफर, प्रोफाइल अपडेट, पेन्शन यांसारख्या प्रक्रिया आता इतक्या सोप्या आणि पारदर्शक झाल्या आहेत, की ज्यांना याआधी महिनोंमहिने कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या, त्यांना हे स्वप्नासारखं वाटेल.EPFO Updates 2025
हे पण वाचा :– 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आज पासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
घरबसल्या प्रोफाइल अपडेट, कोणत्याही कागदपत्राशिवाय
आजवर एखाद्याचं नाव चुकीचं टाकलं गेलं, जन्मतारीख किंवा लिंग यामध्ये चूक झाली, की मग त्यासाठी नोकरीची कंपनी, EPFO ऑफिस, पुरावे, सही-शिक्के अशा अनंत गोष्टींचा झंझट असायचा. पण आता जर तुमचा UAN आधारशी लिंक असेल, तर तुम्ही घरी बसून, मोबाइलवरूनच तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, लिंग, वैवाहिक स्थिती, आई-वडिलांचं नाव, नागरिकत्व अशी सर्व माहिती सुधारू शकता. काही जुन्या खात्यांमध्ये (१ ऑक्टोबर २०१७ पूर्वीचे) कंपनीची अनुमती लागेल, पण ही प्रक्रिया तरीही लवकरात लवकर पूर्ण करता येईल, कारण सिस्टमच आता सुलभ झाली आहे.
पीएफ ट्रान्सफर म्हणजे आता काही मिनिटांचं काम
नोकरी बदलल्यानंतर पीएफ दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करणं म्हणजे भलतंच मोठं आव्हान असायचं. जुन्या कंपनीकडून मंजुरी, पेपर वर्क, प्रतीक्षा सगळं मिळून काही महिन्यांचं काम. पण आता १५ जानेवारी २०२५ पासून EPFO ने ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित केली आहे. जर तुमचा UAN आधारशी लिंक आहे, आणि जुनी व नवीन कंपनीमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग यामध्ये काहीही तफावत नाही, तर ट्रान्सफर थेट आणि झटपट होतो. म्हणजे तुमचे पैसे कुठे अडणार नाहीत, ना ते हरवतील.
EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करू शकता
पेन्शन मिळणार थेट खात्यात, कोणतीही झंझट नाही
एक काळ होता, जेव्हा पेन्शन मिळवण्यासाठी लोकांना महिनोंमहिने वाट पहावी लागायची. काहींचे पेमेंट PPO कार्यालयात अडकायचं, तर काहींचं चुकीच्या बँकेत पाठवलं जायचं. पण आता १ जानेवारी २०२५ पासून EPFO ने CPPS (Centralized Pension Payment System) सुरू केलं आहे. त्यामुळे पेन्शन थेट NPCI च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणतीही बँक असो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणं सोपं झालं आहे, कारण तुमचं PPO नंबर थेट UAN शी लिंक असेल.
जास्त पगारवाल्यांसाठी मोठी बातमी जास्त पेन्शन मिळणार स्पष्ट नियमांनुसार
ज्या कर्मचाऱ्यांचा पगार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, आणि जे अधिक योगदान करतात, त्यांना पूर्वी पेन्शनसाठी खूप लढावं लागायचं. पण आता सगळ्यांसाठी समान नियम लागू करण्यात आले आहेत. मोठ्या कंपन्यांनी जरी स्वतःचे ट्रस्ट चालवले, तरी त्यांनाही EPFO च्या नव्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे मोठ्या पगारवाल्यांना त्यांच्या मेहनतीच्या पूर्ण मोबदल्यासह पेन्शन मिळेल, असं आश्वासन या नव्या प्रणालीने दिलं आहे.
पीएफमधील चूक दुरुस्त करणं आता फारच सोपं
पूर्वी जरा जरी माहिती चुकीची नोंद झाली, की काढणीच्या वेळी प्रचंड अडचणी यायच्या. पण १६ जानेवारी २०२५ पासून EPFO ने Joint Declaration Form (JDF) सादर करण्याची प्रक्रिया इतकी सोपी केली आहे, की आता फॉर्म भरा आणि थेट दुरुस्ती. कोणताही मोठा पुरावा, कंपनीकडून अनेकदा मंजुरी घेणं हे सगळं मागे पडलं. यामुळे काढणीच्या वेळी गोंधळ होत नाही आणि खात्यात पैसे लगेच मिळतात.
आता गरज नाही कोणत्याही दलालाची, कोणत्याही फेऱ्यांची
या सर्व सुधारणा बघितल्या, तर एक गोष्ट स्पष्ट होते. EPFO आता खरोखर कर्मचाऱ्यांच्या सेवेत उतरलं आहे. हे सगळं डिजिटल, पारदर्शक आणि स्वयंचलित झाल्यामुळे सामान्य माणसाला आता कुणाकडे हात पसरवण्याची गरज उरलेली नाही. शेतकरी कुटुंबातून आलेला एखादा कामगार, जो मोठ्या शहरात नोकरी करतोय, त्याच्या भविष्याची चिंता यामुळे कमी होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी जर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तर येथे क्लिक करा