11th admission form :- राज्यातील लाखो दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. आतापर्यंत ही पद्धत फक्त मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती अशा मोजक्या विभागांपुरती मर्यादित होती. पण आता शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्वच जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
गावागावात, तालुक्यांमध्ये राहणाऱ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुविधा आहे. कारण याआधी विविध महाविद्यालयांची कार्यालयं फिरावी लागायची, माहिती गोळा करावी लागायची. आता मात्र एकाच संकेतस्थळावरून
तुम्ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकता :–
https://mahafyjcadmissions.in जर तुम्हाला 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करू शकता. आता सोशल मीडियावरती अनेक वेबसाईट वायरल होत आहेत परंतु तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे तुम्ही तुमची माहिती योग्य ठिकाणी देणे आवश्यक आहे यासाठी सरकारने ही अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.सगळं काही पारदर्शकपणे पाहता आणि करता येणार आहे.
नोंदणीला सुरुवात, प्रवेश प्रक्रियेचं टाइमटेबल जाहीर
या वर्षी राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी यामध्ये नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी २१ मेपासून सुरू होणार असून, २९ मेपर्यंत ती प्रक्रिया चालणार आहे . विद्यार्थ्यांना यामध्ये किमान एक आणि कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. म्हणजे तुम्हाला कुठं शिकायचंय, हे तुमच्याच हातात.
हे पण वाचा : आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर..
यावेळी एक नवीन सुविधा म्हणजे १९ आणि २० मेला दोन दिवसांचा अर्ज भरण्याचा सराव ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आधीच अभ्यास करून, योग्य माहिती भरून अर्ज कसा करायचा याचा सराव करून घ्यावा, असं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे.
अर्ज केल्यानंतर लागणार तीन गुणवंत यादी :
पहिली फेरी , तात्पुरती आणि अंतिम यादी
- ३० मे: तात्पुरती गुणवत्ता यादी
- १ जून: हरकती आणि सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख
- ३ जून: अंतिम गुणवत्ता यादी
- ६ ते १२ जून: या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची गरज
राखीव कोटा, व्यवस्थापन आणि अल्पसंख्यांक प्रवेश
अर्ज भरतानाच अंतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक कोट्यासाठी निवड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ३ जूनपासून राखीव जागांवरील प्रवेश सुरू होणार आहेत.
प्रवेश शुल्कही आता ऑनलाइन!
विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी यावर्षी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अकरावीच्या प्रवेशासाठी शुल्क फक्त ऑनलाइनच भरता येणार आहे. म्हणजे रोखीची देवाणघेवाण नाही, पारदर्शक व्यवहार.
कोणत्या विभागात किती जागा?
विभाग | एकूण जागा | कला | वाणिज्य | विज्ञान | |
मुंबई | ४,६१,६४० | २२,९५५ | २,७२,९३० | १,६०,७१५ | |
पुणे | ३,७५,८४६ | १,०३,७०५ | १,०१,९७१ | १,७०,१७० | |
संभाजीनगर | २,६६,७५० | १,११,१६५ | ४२,६१५ | १,१२,६७० | |
नागपूर | २,१४,३९५ | ७६,३९५ | ३८,८३० | ९९,८७० | |
नाशिक | २,०७,३२० | ८३,००० | ३७,०२० | ८६,७३० | |
कोल्हापूर | १,९३,२७८ | ६४,५७२ | ४८,४६६ | ८०,२४० | |
अमरावती | १,८६,४७५ | ८०,७४० | २४,३४० | ८१,३९५ |
एकूण राज्यभर जागा – २०,४३,२५४!
त्यामध्ये विज्ञान शाखेत सर्वाधिक ८,५२,२०६, वाणिज्य ५,४०,३१२, आणि कला शाखेत ६,५०,६८२ जागा उपलब्ध आहेत.
1 thought on “11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आज पासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ”