खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का नाही? तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News: महाराष्ट्रातील शेतकरी मागील काही महिन्यापासून अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी परिश्रमातून उभा केलेली शेती पाण्याखाली वाहून गेली होती. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून अखेर मदतीचा वर्षाव सुरू झाला आहे. 20,000 कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने जलद गतीने सर्व जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा अहवाल तयार करून केंद्राला सादर केला आहे. केंद्र सरकारकडून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत अतिरिक्त निधी दिला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली असून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही.

महाराष्ट्रातील अनेक भागात जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे कापूस सोयाबीन मका भात यासारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही ठिकाणी घर जनावराच्या गोठा आणि शेती संबंधित साधनही वाहून गेले आहेत. अशावेळी या वीस हजार कोटी रुपयांच्या मदतीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारा ठरणार आहे. Farmer News

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून यादी तयार झाली आहे आणि थेट बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. पुढील काही दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली असेल. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नियमित आमच्या सरकार घेत आहे. शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी देखील आमच्या सरकारकडून दिले जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला आहे. काहींच्या खात्यात पैसे जमा झाले तर काहींची वाट अजून सुरू आहे. पण या मदतीच्या आधारामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा असेच नवीन किरण उजळले आहे. निसर्गाकडून झालेली नुकसान भरपाई भरून काढणं जरी शक्य नसले तरी रब्बी हंगामात पुन्हा एकदा नवीन उत्साहाने पेरणी करण्यासाठी नक्कीच हातभार लागणार आहे. राज्य सरकारने मदत देताच आता सर्वांच्या नजरा केंद्र सरकारकडे आहेत. कारण केंद्राकडून NDRF निधी मंजूर झाल्यास राज्यात अजून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे खत आणि सिंचन सुविधा उपलब्ध करण्यास मदत मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!