गाय गोठ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता 2 लाख रुपये पर्यंत अनुदान ! पहा अर्ज करण्याची शेवट तारीख 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Gay Gotha Anudan :-  राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह निर्माण करू शकतात, शेतकऱ्यांना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाई व म्हशी पालन करण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना गाई म्हशी पावसापासून किंवा उन्हापासून वाचवण्यासाठी त्यांना एक पक्का निवारा लागत असतो. ही गोष्ट सरकारच्या लक्षात घेता सरकारने आता गाई व म्हशी  साठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यात योजना काम करत आहे. 

हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी 2021  वर्षामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना जाहीर केली होती. या योजनेचे अंतर्गत  शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना गाई म्हशी  पालन करण्यासाठी या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना तब्बल दोन लाख रुपये अनुदान दिले जात आहे जेणेकरून आता पाऊस व उन्हापासून गाई म्हशीचे संरक्षण होणार आहे. 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी सरकार मदत करीत आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगल्या  राहणार आहे व दूध उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या खर्चामध्ये आता मोठी सवलत मिळणार आहे. चांगला बांधकाम करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक पैसे लागत आहेत परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता हातभार लागणार आहे.

हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

योजनेला अर्ज कसा व कोठे करायचा :- 

शेतकरी बांधव जे जनावराचे संगोपन करीत आहे त्याकरिता योग्यरीत्या त्यांना त्यांचे संरक्षण करता यासाठी सरकारने योजना राबवली आहे. या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत तुमच्या पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या योजनेला अर्ज करता येणार आहे. 

हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

शेतकऱ्यांना किती मिळणार अनुदान :- 

  • ज्या शेतकऱ्याकडे दोन ते सहा जनावरांचा  गोठा बांधायचा आहे त्या शेतकऱ्यांना 77 हजार रुपये शासनाकडून अनुदान म्हणून मिळणार आहे. 
  • ज्या शेतकऱ्यांना सहा ते बारा जनावरांचा गोठा बांधायचा आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 1 लाख 54 हजार रुपये मिळणार आहेत. 
  • व जे शेतकरी यापेक्षा जास्त जनावरांसाठी गोठा बांधणार आहेत अशा शेतकऱ्यांना तीनपट म्हणजे 2 लाख 31 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Leave a Comment