Goat Farming: देशातील विविध राज्यांमध्ये शेतकरी शेती सोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. काही शेतकरी असे आहेत जे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीसोबत जोडधंदा शेळीपालन म्हणून निवडतात. पशुपालनात शेळीपालन हा लोकप्रिय व सर्वोत्तम व्यवसाय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेळ्याचा आकार आणि कोणत्याही हवामानात शेळ्यांची राहण्याची क्षमता. अगदी कमी जागेतही तुम्ही शेळी पालन सहजरित्या करू शकता. आता आपण कमी जागेत 100 शेळ्या पाळण्यासाठी किती खर्च आणि किती जमीन लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
100 शेळ्या पाण्यासाठी किती खर्च येईल?
आता कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा म्हटलं तर त्यासाठी किती खर्च येईल हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही 100 शेळ्या एकत्र पाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे युनिट उभारण्याचा खर्च वीस लाख रुपयापर्यंत येतो. यावर शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद देखील आहे. मात्र तुम्ही कोणत्या राज्यात शेळीपालन करत आहात यावर देखील ते अवलंबून आहे. कारण अशा योजना राज्य सरकार चालवते. एकल शेतकरी योजनेअंतर्गत अर्ज करून शेळीपालनावर दहा लाख रुपयांच्या अनुदान मिळू शकते.
सोन्याच्या भावात मोठी घसरण! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल
शेळीपालनासाठी सबसिडी चा लाभ घ्या
जर तुम्ही राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 50 लाख रुपयांचे अनुदान मिळवले असेल तर तुम्हाला 500 शेळ्या पाळाव लागतील. त्यासाठी तुम्हाला 25 बिजू शेळ्या देखील ठेवाव्या लागतील. पाचशे शेळ्या आणि 25 बिजू शेळ्यांचा संभाळण्यासाठीचा प्रकल्पाचा खर्च एक कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. यावर तुम्ही 50 टक्के म्हणजेच 50 लाख रुपये पर्यंत सबसिडी मिळू शकतात. अशाप्रकारे तुम्ही सरकारी योजनेअंतर्गत सबसिडीचा लाभ घेऊन शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतात. Goat Farming
शेळीपालन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे?
जर तुम्हाला एक वेळा 100 शेळ्या पाळायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला जास्त जागा लागेल. 100 शेळ्यांसाठी 1000 चौरस फूट जागा आवश्यक असते. शेळ्या नैसर्गिक रित्या सक्रिय प्राणी असल्यामुळे त्यांना बाहेर फिरण्यासाठी आणि करण्यासाठी थोडी जागा असणे आवश्यक आहे. यामुळे गर्दी टाळण्यासाठी जास्त जागा असणे आवश्यक आहे. ज्यामुळे ताण आक्रमकता आणि रोगाचा प्रसार रोखता येतो. एक हजार चौरस फूट क्षेत्रात शेळ्या मोकळ्या पद्धतीने वावरू शकतात. शेळीपालनात किती नफा राहील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही शेळीपालन करताना एका वेळी 100 शेळ्या आणल्या तर तुम्हाला वार्षिक बारा ते पंधरा लाखापर्यंत उत्पन्न निघू शकते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा