महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹1140 ची उडी जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold price hike news | सोनं खरेदीच्या तयारीत आहात का? मग थांबा थोडं! कारण आजची ही बातमी तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारी आहे. आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत जो मोठा बदल पाहायला मिळतोय, तो थोडा काळजीत टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. लोक विचार करत होते, “थोडं थांबावं, किंमत आणखी कमी होईल…” पण नेमकं उलट घडलंय!  Gold price hike news

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सातबारा आणि ८अ उतारे थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

गेल्या १० दिवसांत सोन्याची किंमत १,०१,००० रुपयांवरून घसरत घसरत थेट ९७ हजार रुपयांपर्यंत आली होती. लोकांमध्ये एक आशा होती – “चांगलं घसरेल, मगच खरेदी करू.” पण आज १ जुलै २०२५ रोजी सोन्याने पुन्हा उडी घेतलीय.

किती उडी? तर तब्बल 1140 रुपयांची!

काल ३० जून रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत होती ९७,२६० रुपये.

आज ती पोहोचलीय थेट ९८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम वर.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे आजचे दर (1 जुलै 2025)

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, जळगावमध्ये

🔸 18 कॅरेट सोनं – ₹73,800 (₹860 ने वाढ)

🔸 22 कॅरेट सोनं – ₹90,200 (₹1050 ने वाढ)

🔸 24 कॅरेट सोनं – ₹98,400 (₹1140 ने वाढ)

नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडीमध्ये

🔸 18 कॅरेट सोनं – ₹73,830 (₹860 ने वाढ)

🔸 22 कॅरेट सोनं – ₹90,230 (₹1080 ने वाढ)

🔸 24 कॅरेट सोनं – ₹98,430 (₹1140 ने वाढ)

एवढा फरक अचानक का?

गेल्या आठवड्यात डॉलरची स्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेले बदल आणि गुंतवणूकदारांची मानसिकता – हे सगळं यामागचं प्रमुख कारण आहे. सोबतच देशांतर्गत लग्नसराईचंही वातावरण येऊ लागलंय. लोक मागणी करतायत, आणि जिथे मागणी वाढते तिथे दरही उसळतात, हे आपण शिकलंच आहे.

हे पण वाचा| Gharkul Yadi: घरकुल यादीत तुमचं नाव आहे का? असे चेक करा यादीत तुमचे नाव

जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आजचं गणित थोडं बदललंय. कालपर्यंत जी किंमत ९७ हजारांच्या घरात होती, ती आता पुन्हा जवळपास ९८.५ हजारांवर गेलीय. अजून थांबावं की लगेच खरेदी करावी? हे ठरवताना बाजाराची चाचपणी करणं गरजेचं आहे.

शेतकरी बांधव, महिला बचतगट, लग्नासाठी साठवणूक करणारे पालक  यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण छोट्या थोड्या दरवाढीचा मोठा परिणाम त्यांच्या बजेटवर होतो.

(Disclaimer: वरील सोन्याच्या किमती स्थानानुसार किंचित बदलू शकतात. खरेदीपूर्वी स्थानिक बाजारातील भाव तपासून घ्या.)

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment