Gold Rate Today: गावात लग्नसराई सुरू झाली आहे. कुठं बँड, कुठं सनई–चौघडे… कुणाच्या मुलीचं लग्न, कुणाच्या मुलाचं. आणि अशा वेळी ज्या गोष्टीकडे सगळ्यांचे डोळे लागलेत, ती म्हणजे सोन्याचा दर. आज 19 मे 2025 रोजी सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया. कालचं सोनं बघितलं आणि आजचं बघितलं, तर दरात पुन्हा एक उसळी दिसतेय. गेल्या महिन्यात सोन्याने अक्षरश: शंभरी पार केली होती. एक लाख रुपये दहा ग्रॅमचं सोनं झालं होतं. मग जरा कमी झालं, श्वास घेतला बाजाराने… पण आता पुन्हा दर हळूहळू वर चढताना दिसतायत.
18 मे ला काय भाव होते?
- 24 कॅरेट सोनं: ₹95,130
- 22 कॅरेट सोनं: ₹87,200
- 18 कॅरेट सोनं: ₹71,350
हे पण वाचा | राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा…
आज 19 मे ला काय भाव आहेत?
आज सकाळी सोन्याचा बाजार उघडला, आणि दर पुढं सरकलेत. महाराष्ट्रात बघा कुठं कुठं काय भाव आहेत:
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव – एकसारखा भाव:
- 18 कॅरेट: ₹71,630
- 22 कॅरेट: ₹87,550
- 24 कॅरेट: ₹95,510
नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी – थोडा जास्त दर:
- 18 कॅरेट: ₹71,660
- 22 कॅरेट: ₹87,580
- 24 कॅरेट: ₹95,540
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार?
सोनं खरेदी करायचंय म्हणणाऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. गावात लग्न असेल, मुलीचं साखरपुडा असेल, की कुणी थोडी गुंतवणूक करायची म्हणत असेल. तर सध्या सोन्याचे दर किती आहेत व गुंतवणुकीसाठी किंवा सोने खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.
सोनं म्हणजे काय?
सोनं म्हणजे बायकोच्या कुडीचा अभिमान, आईच्या साचवलेल्या पैशाचं सार्थक… आणि संकटात उपयोगी पडणारा आधार. आजही एखादी म्हातारी आजी गाठोड्यातून कापड उघडते, आणि त्यात ठेवलेलं सोनं पाहून डोळ्यात पाणी येतं – “हीच तर माझी शंभर टक्के बचत!” Gold Rate Today
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा