Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरु आहेत. एक दिवस सोनं गगनाला भिडतं, तर दुसऱ्याच दिवशी त्या किमतीत प्रचंड घसरण होते. अशा स्थितीत सर्वसामान्य गृहिणींपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकजण रोज सोन्याच्या भावाकडे डोळा लावून बसलेला आहे. कारण सोनं केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नाही, तर ती आपल्या भविष्याची आर्थिक हमीदेखील आहे.
हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत रेशनसोबत मिळणार दरमहा 1,000 रुपये; जाणून घ्या पूर्ण माहिती
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण
आज सोमवारच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त झालंय आणि त्यामुळे बाजारात एकच हलकल्लोळ माजलाय. 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे अनुक्रमे 400, 440 आणि 330 रुपयांची मोठी घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत थोडीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा किमती खाली आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय.
हे पण वाचा | राज्यातील या 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट; या भागात होणार अतिमुसळधार पाऊस
सध्या असे आहेत सोन्याचे दर
- 22 कॅरेट सोनं – आज 10 ग्रॅमचा दर 400 रुपये कमी होऊन सरासरी 89,500 ते 89,530 रुपये इतका आहे.
- 24 कॅरेट सोनं – आज दहा ग्रॅमची किंमत 440 रुपयांनी घसरून 97,640 ते 97,670 रुपये दरम्यान आहे.
- 18 कॅरेट सोनं – दहा ग्रॅमसाठी 330 रुपयांची घट झाली असून आता याचा दर 73,230 ते 73,260 रुपये दरम्यान आहे.
हे पण वाचा | वाईट काळ संपला! 26 मे 2025 पासून ‘या’ 3 राशींचा सुरू होणार नव्या यशाचा प्रवास; मिळणार जबरदस्त यश..
शहरानुसार सोन्याचे भाव –
शहर | 22 कॅरेट | 24 कॅरेट | 18 कॅरेट |
मुंबई | ₹89,500 | ₹97,640 | ₹73,230 |
पुणे | ₹89,500 | ₹97,640 | ₹73,230 |
नागपूर | ₹89,500 | ₹97,640 | ₹73,230 |
कोल्हापूर | ₹89,500 | ₹97,640 | ₹73,230 |
नाशिक | ₹89,530 | ₹97,670 | ₹73,260 |
लातूर | ₹89,530 | ₹97,670 | ₹73,26 |
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; या तारखेला जमा होणार ₹1500?
दागिने बनवण्यासाठी खर्च किती येईल?
जर तुम्ही आज 22 कॅरेट सोन्याचा साधारण 10 ग्रॅम वजनाचा नेकलेस बनवण्याचा विचार करत असाल, तर केवळ सोन्याचा खर्च सुमारे ₹89,500 इतका होईल. यामध्ये घासार, मेकिंग चार्जेस आणि GST वेगळं धरावं लागेल. तरीही, कालच्या तुलनेत आज जवळपास 400-500 रुपयांची बचत निश्चित होते. Gold Rate Today
आपल्या गावाकडच्या घरात आजही सोनं म्हणजे ‘संसाराची गाठ’ असते. मुलीच्या लग्नात आई-वडील वर्षानुवर्षं साठवलेलं सोनं देतात. अशा वेळी सोनं स्वस्त झालं, तर सामान्य माणसाला थोडासा दिलासा मिळतो. आजचा दिवस अशा प्रत्येकासाठी दिलासादायक आहे. सोन्याचं बाजार कितीही चढ-उतार करत असलं, तरी त्यामागची आपल्या भावनांची किंमत नेहमीच अमूल्य असते. म्हणूनच, अशा संधीचं सोनं करत, भविष्यासाठी एक छोटीशी गुंतवणूक आजच करून टाका.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सोनं झालं स्वस्त..! आज सोनं खरेदी करायची सुवर्णसंधी; जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचे नवीन दर”