Gold-Silver Price: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल; खरेदी करण्याआधी जाणून घ्या ताजे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Price: दिवाळी सण हा संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या सणानिमित्त अनेक घरात सोन्या-चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी दिवाळी आधीच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोने चांदीच्या किमतीमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड चढ-उतार होताना दिसत आहे. त्यात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याची किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. तुम्ही देखील दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदी करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण सोन्याची खरेदी करण्याआधी सराफ बाजारात काय दर चालू आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आजचे सोन्याचे दर

बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,23,380 रुपये एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,13,098 रुपये एवढा आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमती प्रचंड वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. केवळ सोनंच नव्हे तर चांदीच्या किमतीत देखील वाढ झालेली आहे. एक किलो चांदीचा भाव 1,51,300 रुपये एवढा झाला आहे. म्हणजेच सोने चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. Gold-Silver Price

शहरानुसार आजचे दर

  • मुंबई– 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,12,888 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 1,23,150 रुपये एवढा आहे.
  • पुणे– 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,12,888 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 1,23,150 रुपये एवढा आहे.
  • नागपूर– 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,12,888 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 1,23,150 रुपये एवढा आहे.
  • नाशिक– 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,12,888 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 1,23,150 रुपये एवढा आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त सोन्या चांदीची खरेदी करणे आणि त्यात गुंतवणूक करणे ही आपली परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. मात्र यावर्षी सोन्या-चांदीच्या किमतीत होणारी वाट पाहून अनेक जणांनी सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरी देखील आपल्या कुटुंबातील महिलांना खुश ठेवायचा असेल तर थोडेफार सोन्याचे दागिने खरेदी करावेच लागणार आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे अचूक दर काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

टीप– वरील दिलेले सोन्याचे दर वेगवेगळ्या शहराचे आहेत प्रत्येक शहरानुसार मेकिंग चार्जेस वेगळे असतात, त्याचबरोबर जीएसटी, टीडीएस आणि इतर करांचा समावेश देखील यामध्ये केलेला नाही. त्यामुळे स्थानिक शहरात सोन्याच्या किमतीत थोडाफार बदल आढळू शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी जवळील ज्वेलर्सशी संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment