Gold-Silver Price: खुशखबर! सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचा दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Price: दिवाळीचा सण म्हणजे आनंद उत्साह आणि सोनं चांदी खरेदी करण्याचा सण असतो. प्रत्येक घरात सध्या सणाची तयारी सुरू आहे. या सणानिमित्त सोन आणि चांदी खरेदी करणे पूर्वीपासून परंपरा आहे. विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या किमतीने अक्षरशः गगनाला झेप घेतली होती. वाढत्या किमती पाहून ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कमी झाला होता. मात्र आज पुन्हा एकदा सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण धनत्रयोदशी च्या सकाळीच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव तब्बल एक लाख 35 हजार रुपयापेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे मध्यमवर्गीय खरेदी करणाऱ्यांसाठी अक्षरशः सोने खरेदी करणे अशक्य वाटत होते. पण आज धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या किमतीत तब्बल 3,000 रुपयाची घसरण झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या जळगाव मध्ये आज जीएसटी शिवाय सोन्याचा दर 1,28,400 रुपये प्रति तोळा एवढा झाला आहे. तर जीएसटीसह तो दर 1,32,000 रुपये प्रति तोळा एवढा झाला आहे. सोन्याच्या किमतीत झालेली घसरण पाहून बाजारात पुन्हा एकदा सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बायकांची सराफ बाजारात गर्दी वाढली आहे.

चांदीच्या किमतीत देखील घसरण

फक्त सोनंच नव्हे तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण चांदीच्या वस्तू नाणी दागिने खरेदी करतात. आजच्या घडीला चांदीचा दर जीएसटी शिवाय 1,70,000 रुपये प्रति किलो एवढा आहे तर जीएसटी सोबत 1,75,000 रुपये प्रति किलो एवढा झाला आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत हा दर तब्बल चार ते पाच हजार रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

बाजारामध्ये ग्राहकांचा उत्साह वाढला

सोन्या चांदीच्या किमतीत झालेली घसरण पाहून बाजारामध्ये पुन्हा एकदा ग्राहकांचा उत्साह दिसू लागला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमती कमी होतील अशा अपेक्षेने सोने खरेदी रोखलेल्या नागरिकांसाठी ची योग्य वेळ ठरू शकते. अनेक जणांनी आजच सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून सराफ बाजारामध्ये सर्वसामान्य लोकांची गर्दी दिसू लागली आहे. तुम्ही देखील सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर लगेच जवळील ज्वेलर्स कडे जाऊन योग्य दराची खात्री करून दागिने खरेदी करा.

सध्या जागतिक बाजारात सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केलं जात आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका देखील सोन्याच्या खरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे येत्या काही आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशावेळी आज सारखी घसरण पुन्हा खरेदी करणाऱ्यांना पाहायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे सोन्याचे दागिने किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असे समजून दागिने खरेदी करणे योग्य ठरू शकते. Gold-Silver Price

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment