Heavy rain damage compensation: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेले पीक अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न सतावत आहे. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देऊ अशी दिलासादायक बातमी दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबतची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व जिल्ह्यांकडून माहिती मिळताच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल. असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. Heavy rain damage compensation
सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा परिसरात शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे म्हणजेच ऊस ज्वारी केली डाळिंब सोयाबीन अशा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे घरदेखील उध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. दत्तात्रय भरणे म्हणाले, मी स्वतः मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात फिरलो आहे शेतकऱ्यांच्या अडचणी स्वतः डोळ्याने पहिल्या आहेत. राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे दिले जातील.
कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी सध्या गावोगावी जाऊन नुकसान भरपाई ची पाहणी करत आहेत. काही भागातील माहिती अद्याप बाकी आहे मात्र पुढील काही दिवसात संपूर्ण माहिती मिळेल. केंद्र सरकारकडे एकदा प्रस्ताव पाठवला की त्यात बदल करता येत नाही. म्हणून सर्व माहिती अचूक गोळा करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. एनडीआरएफ च्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात मदत आधीच जाहीर केलेले आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक रकमेचे आश्वासन दिले आहे त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त धारकांना वाढीव मदत दिली जाणार आहे.