IMD WEATHER NEWS | सध्या राज्यात सणसुदीचे दिवस सुरू आहेत आणि याच मुहूर्तावरती हवामान खात्याने पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी दिली आहे. राज्यात सध्या दिवाळी पावसाळी होणार का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात 15 ऑक्टोबर पासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यात दुपारनंतर कुठेही वादळी पाऊस पडू शकतो असं देखील म्हटलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पडत आहे. अनेकांना वाटत होतं आता पावसाने विश्रांती घेतली आणि तो गेला आहे. परंतु, आता पुन्हा एकदा हवामान खात्याच्या इशाऱ्याने शेतकऱ्याने चांगलेच टेन्शन वाढवलेले आहे. IMD WEATHER NEWS
गेल्या नवरात्रीमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि सगळीकडे तारांबळ उडाली होती. आता पुन्हा दिवाळीच्या तोंडावर असंच बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली. नवीन अंदाज मध्ये पंधरा ते ऑक्टोबर (2025) या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वाऱ्यांचा जोर वाढू शकतो असा इशारा दिला आहे.
राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता?
हवामान विभागाच्या ताज्या (Latest forecast from the Meteorological Department) अंदाजानुसार, विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड आणि परभणी परिसरात ढगाळ वातावरण असून अधून मधून पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, Pune, सोलापूर, सातारा या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
राज्यात हवामान खात्याने दिलेल्या इशारामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसू शकतो. आधीच शेतकऱ्यांचे पूर्ण पिक वायला गेल आहे. त्यातच पुन्हा एकदा हे वातावरण अधिक नुकसान करणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सध्या अनेक भागात कापूस, सोयाबीन, मका अशा पिकांची काढणी सुरू झालेली आहे. त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले पीक वायला जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर शेतातील काढणी करून घ्यावे. आणि आवश्यक असल्याचे योग्य त्या ठिकाणी त्यांची नियोजन करावे. कापूस, सोयाबीन, मका या पिकांना व्यवस्थित प्रकारे झाकून ठेवा.
Weather News | पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारा हवामान अंदाज, या भागात होणार मुसळधार पाऊस ?