Kanda Bajar Bhav: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. यावर्षी कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होते. कांद्याचे उत्पादन घटल्यानंतर देखील कांद्याचे दर वाढले नाहीत यामुळे शेतकरी हतबल झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने आपला कांदा जाळीत साठवून ठेवला होता. मात्र दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नविलाजाणे आपला कांदा विक्रीसाठी घेऊन जावा लागला. कांदा विक्री केल्यानंतर टेम्पोचे भाडं आणि मजुराचा खर्च देखील मोठ्या मुश्किल्याने निघत होतं. अक्षरशा काही शेतकऱ्यांनी कांदा उकांड्यात फेकून देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारात चांगली हालचाल पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून मंदावलेले कांद्याचे दर वाढत्या दिशेने मार्ग धरू लागले आहेत. विशेष म्हणजे लाल कांद्याच्या आवके बरोबरच त्याच्या दरात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. हे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद झळकू लागला आहे. Kanda Bajar Bhav
हे पण वाचा| सोयाबीनची आवक घटली! दर मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव
कांद्याच्या बाजारात तब्बल 37 हजार 442 पिशव्यामधील 18621 क्विंटल लाल कांद्याची विक्री झाली. यावेळी लाल कांद्याला कमाल दर 2375 रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा नोंदवण्यात आला आहे. दरात झालेली ही सुधारणा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. बाजार समितीच्या आकडेवारीनुसार, लाल कांद्याच्या विक्रीतून एकूण 1 कोटी 68 लाख 21 हजार रुपयाची उलाढाल झाली. तब्बल 186 ट्रक लाल कांदा बाजारात दाखल झाला होता. या विक्रमी उलाढालीमुळे सोलापूर बाजार पुन्हा एकदा चर्चेचे कारण बनला आहे.
दरम्यान कर्नाटकातून येणाऱ्या पांढऱ्या कांद्याचे आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. शुक्रवारी बाजार समितीमध्ये फक्त नऊ ट्रक पांढरा कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या दरात देखील चांगली हालचाल दिसून आली आहे. पांढऱ्या कांद्याचा किमान दर ₹200 तर कमाल दर 3,100 रुपये प्रति क्विंटल एवढा नोंदवला गेला आहे. सर्वसाधारण दर 1500 रुपये एवढा नोंदवला गेला आहे. पांढऱ्या कांद्याच्या विक्रीतून देखील चांगली उलाढाल झाली असून 1 कोटी 43 लाख 7 हजार रुपयाचा व्यापार झाला आहे. यामध्ये सोलापूर पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता.
बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार दर वाढल्यामुळे शेतकऱ्याकडून कांदा विक्रीसाठी जास्त प्रमाणात येऊ लागला आहे. मागणी वाढल्याने दरही चांगला मिळत आहे. पुढील काही दिवसात कांद्याचे दर चांगल्या स्तरावर स्थिर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता बाजारात चांगले तेजीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागल्याची भावना व्यक्त केली जात असून दर स्थिर राहिल्यास पुढील आठवड्यात आणखीन आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
