Ladaki Baheen Yojana Big Update : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकरच आता त्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा तीन हजार रुपये जमा होणार आहेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊया या बातमीबद्दल सविस्तर माहिती. Ladaki Baheen Yojana Big Update
राज्यातील महिलांसाठी एक महत्वकांक्षा योजना राबवली आहे. ती (Mukhymantri Ladki Bahin Yojana) म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनत चाललेली आहे. या योजनेला राज्यांमधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जवळपास राज्यांमधून या योजनेमध्ये दोन कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे महिलांना 4500 मिळालेले आहेत. आता याच योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना महत्त्वाची माहिती दिली.
बीड येथे अजित पवार यांची एक महत्त्वाची सभा झाली. या कार्यक्रमादरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भात मोठे वक्तव्य केलेले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणार आहे. हा दादांचा वाद आहे असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलेले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिवाळी पूर्वी तीन हजार रुपये खात्यात येणार आहे याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे.
आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा
राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत. ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केले आहे. त्या महिलांना एक सोबत तीन हजार रुपये मिळाले आहेत. त्यासोबत ज्या महिलांनी 18 ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहे. त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांचे ₹4500 रुपये मिळाले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा महिन्यांच्या खात्यावरती 3000 हजार रुपये जमा होणार असे वक्तव्य केले आहे. यामुळे महिलांमध्ये आता पुन्हा आनंदाची लाट उसळली आहे.