Ladki Bahin Yojana : “लाडकी बहीण योजना” हा महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे, ज्यामुळे अनेक भगिनींची प्रतीक्षा संपणार आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मान्सून मोठी विश्रांती घेणार…
मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्या
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता ‘लाडक्या बहिणीं’च्या थेट खात्यात जमा झाला होता, त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ताही लवकरच थेट त्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. याबाबत कोणताही गैरसमज पसरवला जात असला तरी, योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे च्या आसपास दिला गेला होता, त्यामुळे मे महिन्याचा हप्ताही लवकरच येईल अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या किंमती 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या बाजारात काय होणार तज्ज्ञांचा सल्ला
सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ बंद, गैरसमज दूर
या योजनेबाबत काही गैरसमज पसरवले जात असल्याचे आदिती तटकरे यांनी नमूद केले. विशेषतः सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या आरोपावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. जानेवारी महिन्यापासून अशा सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देणे बंद करण्यात आले आहे. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी केलेल्या बारकाईने तपासणीत सुमारे २ ते २.५ हजार सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. हे लक्षात येताच त्यांना लाभ देणे तात्काळ थांबवण्यात आले. याचा अर्थ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसून, ती महायुती सरकारं जुलै २०२४ पासून सुरू ठेवलेली एक निरंतर योजना आहे. या योजनेद्वारे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना १० महिन्यांची रक्कम देण्यात आली आहे
ऊसतोड कामगार महिला आणि महिला आयोगाची भूमिका याव्यतिरिक्त, आदिती तटकरे यांनी ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या गंभीर मुद्द्यावरही सरकार काय कार्यवाही करत आहे याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात रिपोर्ट मागवून त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेवर कारवाईची तयारी, तुमचं नाव यादीत आहे का?
महिला आयोगासंदर्भात झालेल्या बैठकीबद्दल बोलताना, त्यांनी सांगितले की, काही कारणांमुळे सर्वांना निमंत्रित करता आले नाही, परंतु बैठकीतून येणाऱ्या सूचनांवर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. काही बदलांच्या सूचना आल्यास त्या अंमलात आणल्या जातील असेही त्यांनी म्हटले. महायुतीतून कोणीही वैयक्तिक टीका केली नसून, महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सूचनांचा विचार नक्कीच केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
एकूणच, आदिती तटकरे यांच्या या अपडेट्समुळे ‘लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक स्थिर आणि उपयुक्त योजना असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील यावर विश्वास ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट समोर..”