Ladki Bahin Yojana | या 8000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे करावे लागणार परत? तुमचे नाव आहे का?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण या योजनेचा फायदा ज्यांना मिळालाच नको होता अशा महिलांना लाभ मिळाला आहे. आत्ताच मिळालेल्या प्रसारमाधमांच्या माहितीनुसार, राज्यातील हजारो सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी हप्ता उचल्याच समोर आल आहे. सरकारकडून स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, या 8 हजार कर्मचाऱ्यांनी जेवढं हप्ता घेतला आहे त्यांचे पै पै परत करावे लागणार आहेत. परिणामी या महिलांचा दसरा आनंदाचा न होता कडवट झालेला दिसतोय. Ladki Bahin Yojana

गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सुरुवातीला फारशी छाननी न करता सरसकट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते. ₹1500 रुपयांचा हप्ता थेट जमा होताचा अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आला होता. सरकारने पुढे तो हप्ता ₹2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा आश्वासन दिलं होतं. पण नंतर अटी शर्ती लागू झाल्या, तपास सुरू झाला आणि गैरप्रकार एका माग एक उघडत गेला. अगदी काही ठिकाणी तर पुरुषांनी देखील लाभ घेतला असले तर समोर आलं.

आता मात्र वित्त विभागाने कडे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून मिळून तब्बल 1500 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. शिवाय, नियम मोडून योजना उचलल्याने या महिलांवर ती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच आता लाभ मिळण्याचे दूरच पण आता आधी घेतलेली पैसे देखील परत करावे लागणार आहे.

या योजनेचा लाभ खरोखर कोणाला मिळतो हेही लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. लाडकी बहीण योजना ही गरीब, निराधार, विधवा, घटस्फोटीत, परितक्या आणि विवाहित महिलांसाठी आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावा लागत. लाभार्थ्यांनी किमान 21 वर्षाच्या असाव्यात, त्याचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणे आवश्यक आहे. त्याशिवाय E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना सुरुवातीपासूनच या योजनेतून वगळण्यात आलं होतं.

पण काहीजणांनी नियमाकडे दुर्लक्ष करून हप्ता घेतला. आता त्या पैशांची एक एक रुपया सरकार वसूल करणार आहे. त्याचबरोबर केवायसी करताना पतीचा आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले असेल बऱ्याच महिलांचा पत्ता साफ होईल असं मानल जात आहे. म्हणजे राज्य सरकारवरचा आर्थिक भार कमी होईल, पण या महिलांवर मात्र आर्थिक फटका बसण्याची शक्यता नक्की आहे. सध्या तरी या निर्णयामुळे 8000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा दसरा हसरा राहता कडू झालेला आहे. आता यापुढे सरकार आणखी किती महिला अपात्र ठरवते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

Leave a Comment