Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचा लाभ महिलांच्या खात्यात जमा केला जातो. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र ई केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. म्हणजेच आता तुम्ही eKYC केली नाही तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण तुमच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे समोर आल्यानंतर 24 ऑक्टोबर 2025 रोजी महायुती सरकारने याबाबत अधिकृतपणे हा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रक्रिया लागू केली होती. मात्र ग्रामीण भागातील महिलांना ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी इंटरनेट सुविधा नव्हती तर काहींना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असे त्यामुळे केवायसी पूर्ण करणे अवघड जात होते.
महिलांकडून आलेल्या असंख्य तक्रारी आणि मागण्या नंतर अखेर सरकारने काही काळासाठी ई केवायसी सक्ती थांबवली आहे. केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिला निराश होत्या. मात्र आता लाखो महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसत आहे. त्याचबरोबर तोंडावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील केवायसी थांबवण्यासाठी मुख्य कारण मानले जात आहे. महिलांना या प्रक्रियेचा त्रास होत असल्याचे समोर आल्यानंतर याचा थेट परिणाम महिलांच्या मतावर देखील होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर सरकारने त्वरित याबाबत निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा| महिलांसाठी गुड न्यूज! या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये येणार ऑक्टोबर चा हप्ता वाचा सविस्तर
यापूर्वी 5 ऑक्टोबरला सरकारने नवीन नियम लागू करून महिला सोबत त्यांच्या पतीचे किंवा अविवाहित महिलांच्या वडिलांची ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले होते. यामागे मुख्य उद्देश होता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का नाही हे पडताळणी करणे. मात्र ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी हे काम आव्हानात्मक ठरत होते. त्यामुळे या अटीमुळे देखील अनेक पात्र महिलांना हप्ता मिळणे थांबले होते. यावर देखील सरकारने महिलांचा आवाज ऐकून ही सक्ती देखील रद्द केली आहे. Ladki Bahin Yojana
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिक दृष्ट्या कुंकवत महिलांसाठी आर्थिक आधार देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात म्हणजे 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. महिलांनी तुमच्या खात्यात आत्ता जमा झाला का नाही तपासण्यासाठी मेसेजची वाट पहावी. लवकरच सरकार याबाबत अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खात्यात पैसे आले का नाही कसे तपासावे?
तुमच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला का नाही किंवा इतर कोणत्याही महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही कसे तपासावे असा प्रश्न पडला असेल. तर तुम्ही खालील चार स्टेप फॉलो करून घरबसल्या तपासून शकतात.
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती किंवा payment status या पर्यावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
- मोबाईलवर आलेल्या ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करून सबमिट करा.
- तुमच्या स्क्रीनवर लगेच हप्त्याची स्थिती दिसेल.
