Ladki Bahin Yojana 2025 | महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! लाखो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य येणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. परंतु आता जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजून महिलांच्या खात्यावरती या महिन्याच्या हप्ता जमा झाला नाही त्यामुळे अनेक महिला नाराजी व्यक्त करीत आहे. Ladki Bahin Yojana 2025
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..
आता अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण की लवकरच आता महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे. राज्यातील महिलांना रक्षाबंधना आधीच आनंदाची गोड बातमी मिळणार आहे, राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून जुलै महिन्यात हप्ता देण्यासाठी तब्बल 2984 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर झालेला निधी ३० जुलै 2025 रोजी अधिकृत शासन निर्णयातून जाहीर केला आहे आता केवळ तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना एकूण 12 हप्ते प्राप्त झाले असेल हे सर्व हप्ते महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा करण्यात आले आहे.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
लाडकी बहीण योजने संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहे, यामध्ये एक बातमी अशी देखील येत आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आत्ता एकत्रित जमा होणार. परंतु यावरती सरकारने आता स्पष्टता सांगितले आहे की यावेळी फक्त जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
महायुती सरकारने यासाठी आधीच २८,२९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा २,९८४ कोटींचा निधी महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे. ही योजना ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असलेल्या हजारो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
Disclaimer:
वरील लेखात दिलेली माहिती विविध विश्वसनीय माध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे. आर्थिक किंवा सरकारी योजनांबाबत अंतिम निर्णय घेण्याआधी संबंधित शासकीय वेबसाइट किंवा अधिकृत सूत्रांद्वारे खात्री करावी.