Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो या तारखेपर्यंत eKYC करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹1500; जाणून घ्या सविस्तर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गोरगरीब महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या रकमेतून अनेक महिला त्यांचा घर खर्च, मुलांची शाळेची फीस, औषधोपचार भागवत आहेत. मात्र आता सरकारकडून या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे केवायसी प्रक्रिया करण्याच्या शेवटच्या तारखेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सरकारकडून 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे.

eKYC का करावी?

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांच्या खात्यात चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे आढळून आले आहेत. त्यामुळे निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेतून महिलांच्या अर्जाची पडताळणी होईल आणि कोणत्याही चुकीच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अजूनही अनेक लाभार्थी महिलांनी केवायसी केलेली नाही. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी उशीर न करता आजच केवायसी करून घ्या.

eKYC ची डेडलाईन..

  • ई–केवायसी करण्याची सुरुवात: 18 सप्टेंबर 2025
  • ई–केवायसी करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2025

म्हणजेच उर्वरित महिलांसाठी आता फक्त 18 दिवस शिल्लक राहिले आहेत. उरलेल्या अठरा दिवसाच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्या महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana

E–KYC कशी करावी?

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • मुख्य पृष्ठावर eKYC बॅनर वर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर कॅप्चर कोड टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल तो टाकून पुढे जा.
  • यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का नाही किंवा तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे का नाही याची तपासणी केली जाईल.
  • जर केवायसी प्रक्रिया केलेली नसेल तर पती किंवा वडीलाचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर ओटीपी टाकून सबमिट करा.
  • पुढे तुम्हाला जात प्रवर्ग विचारला जाईल, तो अचूक भरवा.
  • डिक्लेरेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर काही सोपे प्रश्न विचारले जातील त्याची अचूक माहिती भरा.
  • शेवटी सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज दिसेल.

eKYC केली नाही तर काय होईल?

जर तुम्ही 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, तुमच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार नाहीत. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या महिलाचे पडताळणी झाली आहे त्यांनाच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच प्रक्रिया पूर्ण करून घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. त्यापूर्वी सर्व महिलांनी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment