Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे या सणानिमित्त महिलांना खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित महिलांना 13 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा होतो की, आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचे 1500 जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी गोड होणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा सन्माननिधी दिला जात आहे. आतापर्यंत सरकारकडून 14 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून आता महिलांच्या नजरा पंधराव्या हप्त्याकडे लागल्या आहेत. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळत आहे. गावागावातील महिला या पैशातून घर खर्च भागवत आहेत. त्यात दिवाळीच्या सणानिमित्त हा हप्ता दिल्यामुळे सणाची खरेदी करण्यासाठी नक्कीच आधार मिळणार आहे. म्हणूनच हा हप्ता महिलांसाठी केवळ सरकारी मदत नसून अनेक महिलांच्या जीवन जगण्याचा आधार बनला आहे.
ई–केवायसी करणे अनिवार्य
या योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी व या योजनेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सरकारने नुकतेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई–केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर लाभार्थी महिला विवाहित असेल तर पतीच्या आधार कार्ड द्वारे केवायसी करावी लागणार आहे. आणि जर महिला अविवाहित असेल तर वडिलांच्या आधार कार्ड वरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये विधवा महिलांसाठी केवायसी कशी करावी याबद्दल अपडेट्स देण्यात आले नाही. मात्र सरकार यावर देखील लवकरच महत्वाची माहिती देईल अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त गिफ्ट! सप्टेंबर महिन्याचे ₹1,500 खात्यात जमा; तुम्हाला मिळाले का नाही? लगेच तपासा
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का नाही? कसे तपासावे?
अनेक महिलांना प्रश्न पडतो पैसे आले का नाही कसे कळणार याचे उत्तर अगदी सोपा आहे. तुम्ही खालील स्टेप फॉलो करून घरबसल्या तपासू शकतात तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही? Ladki Bahin Yojana
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून ई–केवायसी स्टेटस देखील तपासू शकतात.
- त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन पासबुक वर एन्ट्री करून किंवा मिनी स्टेटमेंट काढून तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे देखील तपासू शकतात. जर पासबुकच्या एन्ट्रीवर Majhi ladki bahin किंवा Government of Maharashtra अशा नावाचे ट्रांजेक्शन आले तर समजून जा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.
- तुम्ही तुमच्या बँकेकडून येणाऱ्या मेसेज वर देखील तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला का नाही ते तपासू शकता.
- जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरत असाल तर त्यावर लॉगिन करून देखील ट्रांजेक्शन हिस्टरी पाहू शकता.
- जर तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळाली नाही तर तुमच्या तालुका महिला व बालविकास कार्यालयात चौकशी करून खात्री करू शकता.
दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. दिवाळीच्या या तयारी सोबतच या योजनेचा हप्ता मिळाल्याने महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देणारे योजना नसून महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी योजना आहे. मागील काही महिन्यापासून हप्ता वेळेवर मिळत नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत होता मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर हा संभ्रम दूर झाला आहे. ज्या महिलांनी अजून ई केवायसी केली नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचा हप्ता मिळण्यास कोणतेही अडचण निर्माण होणार नाही.