Ladki Bahin Yojana e-KYC: महाराष्ट्रातील गोरगरीब लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 100 रुपयाचा आर्थिक लाभ जमा केला जातो. मात्र आता या लाभासाठी ई–केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी सरकारकडून दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. यासाठीची शेवटची तारीख देखील सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर पर्यंत लाभार्थी महिलांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही. यासाठी फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत.
मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडक्या बहिणींना पुढील महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे राज्यभरातील सर्व लाभार्थी महिलांनी दिलेल्या मुदतीत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे तुम्ही खरी लाभार्थी आहात का तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक आधारशी जोडलेला आहे का याची खात्री शासनाद्वारे केली जाते.
eKYC कशी करावी?
लाडक्या बहिणींनो ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घरबसल्या मोबाईलवर ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकता. Ladki Bahin Yojana e-KYC
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर ladakibahin.maharashtra.gov.in भेट द्या.
- त्यानंतर तुम्हाला ई केवायसी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- लाभार्थी महिलाचा आधार क्रमांक व कॅप्चर कोड टाका.
- Send OTP या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल क्रमांक वर आलेला ओटीपी टाका.
- पुढे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्याचाही ओटीपी प्राप्त करा.
- त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा.
- सर्व माहिती नीट तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करून तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी महिलांचे आधार कार्ड
- लाभार्थी महिलांचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?
मागील काही दिवसापासून काही ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार असा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून याबाबत स्पष्टीकरण देत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. याउलट अधिक अधिक महिलांना या योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात ही योजना सुरूच राहणार असून ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना पुढील महिन्याचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे वेळ न वाया घालता आजच आपली ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जेणेकरून शेवटच्या काही दिवसात साईट चालली नाही तर तुमची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.