Ladki Bahin Yojana latest news | लाडकी बहीण म्हटलं की घरातले खर्च भागवण्यासाठी मिळणारा दीड हजार रुपयांचा आधार आठवतो. महिला वर्गासाठी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला आशेचा किरण ठरली. पण आता हाच किरण मंदावू लागला आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27 हजार 317 महिलांचा पत्ता सरकारने थेट कापला आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
यवतमाळ जिल्ह्यात योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी होती. महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या आशेने महिलांनी लोट घेतला होता. सरकारने अटी शिथिल केल्यामुळे योजनेचा झपाट्याने प्रसार झाला. पण लाभार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे सरकारवर आर्थिक भार वाढला आणि आता काटछाटीला सुरुवात झाली. अनेक महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आलेत. इतकंच नाही तर जुन्या लाभार्थ्यांना सुद्धा हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांवर गर्दी वाढली आहे.
का झाले अर्ज बाद?
लाडकी बहीण योजनेचे निकष आता कडक करण्यात आले आहेत. शासनाने स्पष्ट केलंय की, फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे, ज्या आयकर दाते आहेत, ज्यांना आधीपासून नमो शेतकरी सन्मान, संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ मिळतोय किंवा एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आले आहेत अशा सर्व अर्जदारांना अपात्र ठरवलं जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 27 हजार 317 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय.
हप्ता मिळणार का?
जून आणि जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे त्या वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. पण अद्याप सरकारकडून याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे “हप्ता मिळतोय का?” या प्रश्नाने महिलांचा संयम सुटतोय.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
नोंदणीही बंद
नवीन लाभार्थ्यांसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद आहे. त्यामुळे अनेक महिलांनी उशिरा अर्ज करायचा विचार केला होता, त्यांनाही आता झटका बसलाय. महिला म्हणतायत, “आधी आशा दाखवली, आता त्याच आशेवर पाणी फेरलं”.
राजकारणही तापलंय
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना गाजावाजात जाहीर केली होती. पण आता निधीच्या उशिरामुळे आणि लाभार्थी कपातीमुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांनीही आता प्रश्न उपस्थित केल्यामुळे राजकीय वादळ निर्माण झालंय.
Disclaimer :
वरील माहिती ही अधिकृत अहवाल व माध्यम स्रोतांवर आधारित असून, वेळोवेळी शासकीय नियम व अटी बदलू शकतात. कोणतीही आर्थिक किंवा शासकीय प्रक्रिया करण्याआधी संबंधित शासकीय कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेतून 27 हजार महिलांचा पत्ता कट! यवतमाळच्या महिलांना धक्का तुमचं नाव आहे का ?”