Ladki Bahin Yojana Update | लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, आणि त्यामुळे राज्यभरात लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी अजून हप्त्याचा ठावठिकाणा नाही. गावागावात महिलांच्या ग्रुपमध्ये याच विषयावर चर्चा रंगतेय “ताई, हप्ता आला का गं?”
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आश्वासन दिलं आहे की, ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल. त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुती सरकार या योजनेला पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि ही योजना यशस्वीपणे सुरू राहील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना थोडाफार आधार मिळतो. पण यावेळी हप्ता उशिरा आल्यामुळे अनेक जणींच्या घरात अडचणीचं वातावरण आहे. बाजारात उधारी वाढलीय, घरखर्चाचं गणित बिघडलंय.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
दरम्यान, काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांनी योजना लाटल्याचं समोर आलंय. उदा. साताऱ्यात तब्बल ८४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असून, त्यांच्याकडून १५१ कोटींची वसुली होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात ५१०० कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचं प्राथमिक अंदाजातून समजतंय.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं काही तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणांवर काम सुरू केलं आहे. हाच मुख्य कारण आहे की हप्त्याच्या वितरणात थोडा उशीर झालाय. मात्र, लाभार्थी महिलांना लवकरात लवकर हप्ता मिळावा यासाठी सरकार सज्ज आहे, असं सूत्रांकडून कळतंय.
या योजनेमुळे शेतकरी महिलांपासून ते छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या भगिनींना दरमहा थोडीशी का होईना, पण आर्थिक मदत मिळते. त्यातूनच कोणाच्या मुलाच्या शाळेची फी भरली जाते, कोणाचं किराणं येतं, कोणाच्या आजारपणाची औषधं घेतली जातात.
महिन्याच्या सुरुवातीला मिळणारा हा हप्ता म्हणजे त्यांच्यासाठी मानसिक आधार ठरत असतो. त्यामुळेच या उशीरामुळे अस्वस्थता वाढलीय.सरकारनं या योजनेचा पारदर्शक आणि वेळेवर अंमलबजावणी केली, तर लाखो महिलांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्वावलंबन मिळू शकतं.