Ladki Bahin Yojana Update | ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे, पहिल्या आठवड्याची धावपळ संपली पण लाखो महिलांच्या मोबाईलवर अजून एकच प्रश्न फिरतोय तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर चा हप्ता कधी येणार ? मागच्या महिन्यातही असाच महिलांनी वाट पाहिली, अनेक महिला आपले बँक खाते चेक करीत होते. परंतु महिलांच्या हाती निराशा लागलेली आहे चला तर पाहू काय आहे नवीन अपडेट. Ladki Bahin Yojana Update
सरकारने महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मात्र महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा केले जातात, या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना जगण्याचा आधार मिळाला आहे. पण आता गेल्या काही महिन्यापासून हप्ता वेळेवर न आल्याने महिलांचे मनात नाराजी तर काही महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. महिलांना आता अनेक प्रश्न पडत आहेत आता हप्ता मिळणार की नाही? हा प्रश्न गावोगावीच्या चौकात बस स्टॉप वर मैत्रिणीच्या गप्पांमध्ये फिरत आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार ?
आता सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू झाली आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हप्ता एकत्रित मिळणार? 3,000 हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. राज्य सरकार दिवाळीच्या मुहूर्त साधून हा निर्णय जाहीर करणार अशी चर्चा सोशल मीडिया वरती सुरू आहे. दिवाळीची खरेदी मुलांसाठी कपडे घरासाठी थोडसं संसाराचं साहित्य या सगळ्यासाठी ही रक्कम उपयोगी पडणार म्हणूनच महिलांमध्ये याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
अनेक महिलांनी तर सरळ सांगितला आहे की सरकारने उशीर केला तरी चालेल पण एकत्रित 3,000 हजार रुपये मिळाले पाहिजे. ग्रामीण भागात तर योजनेचे पैसे आल्यावर किराणा विकृती त्यानुसार उधारी देत आहे म्हणूनच हा हप्ता वेळेवर येणे केवळ महिलांसाठीच नाही तर संपूर्ण गावाच्या अर्थचक्रासाठी महत्त्वाचा राहणार आहे.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे !
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहे. आता फक्त ज्या महिलांनी kyc अपडेट केली आहे त्यांना सप्टेंबर चा हप्ता मिळणार आहे. अनेकांनी अजून केवायसी केलेली नाही सरकारने यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला आहे पण काही ठिकाणी इंटरनेट समस्या, किंवा साइट डाऊन अशा अनेक अडचणी समोरी आले आहेत.
या सर्व समस्यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, आदिती तटकरे म्हणाले की ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना पुढील हप्ता दिला जाणार नाही, कृपया तात्काळ केवायसी करा त्यामुळे अजूनही ज्यांनी हे काम केले नाही त्यांनी ताबडतोब आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. आदिती तटकरे म्हणाले की आम्ही साईट व्यवस्थित सुरू राहावी म्हणून यासाठी प्रयत्न करीत आहोत.
गेल्या अनेक महिन्यापासून हप्ते उशिरा येत असल्याने काही महिलांमध्ये नाराजी देखील झाली आहे. पण तरीही बहुतांश महिला आशावादी आहेत त्यांना विश्वास आहे की सरकार दिवाळीच्या आधी नक्की देणार, पण त्यावेळी एकच प्रश्नही विचारला जातो किती वेळ वाट पाहायची ? सरकारने अधिकृतपणे एकदा तरी तारीख जाहीर करावी अशी भावना महिलांमध्ये व्यक्त केली जात आहे.
काहीच अनुभव असा की अचानक पैसे आले की आनंदाने नाचायला लागतात. पण काही महिन्यापूर्वी जुलै चा हप्ता 22 तारखेला आला तर ऑगस्टचा शेवटच्या तारखेला आला नाही त्यामुळे आता सर्वजण म्हणतात की तारीख सांगा आम्ही बसून वाट पाहू!
राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तरी, महिलांमध्ये दिवाळीपूर्वी हप्ता येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही सूत्रांचे म्हणणं आहे की मुख्यमंत्री किंवा आदिती तटकरे येत्या काही दिवसात मोठी घोषणा करणार आहे. राजकीय दृष्ट्या हा काळ महत्त्वाचा असल्याने सरकार हा मुद्दा हातामधून सोडणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..