Lenskart IPO | शेअर बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे Lenskart IPO बद्दल, शेअर बाजार साठी एकच नाव सगळीकडे चर्चेत आहेत ते म्हणजे Lenskart ही डोळ्याची चष्मे विकणारी कंपनी सध्या खूप चर्चेमध्ये आलेली आहे. पहिल्याच दिवशी IPO पूर्ण सबस्क्राईब झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तब्बल 1.5 पट (150%) सबस्क्राईब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी तर कंपनीच्या आरक्षित कोट्याला दोन पट पेक्षा जास्त भर टाकली आहे. म्हणजे आता प्रत्येकाला या कंपनीत हिस्सा मिळवायचा आहे एवढं निश्चित.
Lenskart ने एकूण ₹7,278 कुटींचा IPO आणला आहे. यामध्ये सुमारे 2150 कोटींचे नवे शेअर्स उद्योग उरलेले शेअर्स ऑफर फॉर सेल या माध्यमातून जुन्या गुंतवणूकदारांकडे विकले जात आहेत. कंपनीने दर प्रति शेअर ₹382 ते 402 असा ठरवला आहे आणि जो गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्याला किमान 37 शेअर साठी ₹14,874 एवढं गुंतवणूक करावी लागणार आहे.
मोठ्या गुंतवणूकदारांचा जबरदस्त विश्वास
लिस्टिंग पूर्वीच कंपनीने 147 मोठ्या गुंतवणूकदारांकडून जसं की सिंगापूर सरकार, ब्लॉक रॉक, गोल्डमन सक्स अशा दिग्ग्य संस्थांकडून तब्बल ₹3,267 कोटी जमा केलेले आहेत. हे बघून लहान गुंजनुकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे. कारण असा मोठ्या संस्थांचा पाठिंबा मिळणे म्हणजे कंपनीवर जगकालीन विश्वास आहे ते दाखवते.
कंपनीचा व्हॅल्युएशन म्हणजे बाजारातील किंमत थोडी जड आहे. एका शेअरच्या किमतीनुसार कंपनीचा एकूण मूल्य जवळपास 70 हजार कोटींवर पोहोचते. काही विश्लेषक म्हणतात की कंपनीचा P/E रेशो 230 एवढा आहे म्हणजे कमाईच्या तुलने शेअर किंमत खूप महाग आहे. पण कंपनीचे CEO पियुष बंसल यांनी सांगितलं की, आमचा EBITDA 90% CAGR ने वाढते आणि आमचे मार्केट मोठे आहे. ही कंपनी फक्त भारतापुरती नाही तर जागतिक खेळाडू होणार आहे.
SBI Securities आणि Nirmal Bang सारख्या गोकरेज हाऊसने या ipo ला लॉंग टर्म सबस्क्राईब अस रेटिंग दिले. तर Swastik Investment च्या शिवानी न्याती यांनी म्हटलं की कंपनी मजबूत आहे. पण व्हॅल्युएशन थोडे जास्त आहे. त्यामुळे न्यूटन रेटिंग दिसले. म्हणजे लहान बदलदारांनी लगेच उडी मारायची की थांबायचं हा प्रश्न अजून हवेमध्येच आहे.
सध्या अनलिस्ड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 14 ते 21 टक्के प्रीमियमवर चालू आहेत. म्हणजे जर लिस्टिंगच्या दिवशी मार्केटचा मूड चांगला असेल, तर पंधरा टक्के च्या आसपास नफा मिळण्याची शक्यता आहे. पण पहिल्याच दिवशी प्रीमियम 23 टक्के वर होता, जो आता थोडा कमी झालाय. याचा अर्थ लिस्टिंग गेम मर्यादित असू शकतो.
( Disclaimer : वरी दिलेली माहिती आम्ही प्रसार माध्यमांच्या आधारे दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | शेअर मार्केट मधून मोठी अपडेट! हे 5 शेअर करणार मालामाल! 12 महिन्यात मिळणार डबल परतावा
