Business Idea : व्यवसाय करायचा आहे, परंतु कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही. किंवा तुम्ही सरकारी नोकरी किंवा चांगल्या जॉबच्या शोधात असाल परंतु जॉबच मिळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो जिथे तुम्ही छोटी गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकणार आहात, तेही कमी खर्चामध्ये आणि दररोज चालणारा. मग तुम्ही यापैकी एक पर्याय ठरवून गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या भविष्याला नवीन दिशा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया या बिझनेस प्लॅन बाबत जिथे तुम्ही गुंतवणूक करून भन्नाट आयुष्य जगणार आहात. Business Idea
फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, आणि या मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. तर तुम्ही या व्यवसायात शिरला तर तुम्हाला चांगला नफा होणार आहे आणि भरघोस परतावा देखील मिळत आहे. कारण याला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चाललेली आहे. यादीतील सर्वाधिक नंबरचा हा व्यवसाय खरंच तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि नफा मिळवून देणार आहे. सध्या व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मेकिंग बिझनेसमुळे अलीकडे व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होऊ लागलेली आहे. लग्नसराई आणि सोशल मीडिया वरती चांगले फोटो पोस्ट करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढत आहेत.
आता लवकरच देशभरामध्ये लगन चा सिझन सुरू होणार आहे आणि या सीझनमध्ये या व्यवसायाला पुन्हा मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. अशीच इवेंट प्रोग्राम, बर्थडे, कुठे दुकानाचे उद्घाटन, तर कुठे लहान मुलांचे फोटोशूट, सध्या राजकारणामध्ये देखील फोटोग्राफीची मागणी वाढत आहे. लवकरच स्वराज संस्थेचे इलेक्शन देखील लागणार आहे आणि यामध्ये जाहिरातीसाठी फोटोग्राफीची मागणी देखील वाढणार आहे. या व्यवसायामध्ये गुंतवणुकीसाठी साधारण पाच लाख रुपयापर्यंत खर्च येतो यामध्ये चांगला कॅमेरा लाईट फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग चे साधन करावे लागणार आहेत त्यासोबत कम्प्युटर सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि एक छोटासा स्टुडिओ सेट तुम्हाला करावा लागणार आहे.
होम बेकरी
या यादीतला सर्वात महत्त्वाचा आणि पाच लाख रुपयांमध्ये सुरू करण्यात येणारा हा व्यवसाय म्हणजे होम बेकरी हा बिजनेस सध्या महत्त्वाचा आणि चांगला प्रॉफिटेबल आहे. लोकांना ताजे स्वच्छ घरगुती अन्न आवडते. जर तुम्ही घरच्या घरी चांगले बेकरी किंवा मिठाईचा व्यवसाय सुरू करू शकता आणि चव चांगली असेल तर तुम्हाला नियमित ग्राहक मिळतील आणि काही महिन्यातच तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.
