LPG Gas Cylinder Subsidy: नमस्कार मित्रांनो, आज 31 मार्च 2024 आहे म्हणजे आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आर्थिक वर्ष 2024-25 ला सुरुवात होणार आहे. या दरम्यान या नवीन आर्थिक वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्षात सर्व नागरिकांना एक मोठी भेट मिळणार आहे.
सर्वसामान्य कुटुंबांना स्वस्तात गॅस सिलेंडर खरेदी करता येणार आहे. यामध्ये पात्र कुटुंबांना गॅस सिलेंडर मध्ये तब्बल तीनशे रुपयांचे अनुदान भेटणार आहे. सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पीएम उज्वल योजनेची मुदतवाढ केली होती. पीएम उज्वल योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना घरगुती गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते. ही सबसिडी योजना 31 मार्चला संपणार होती.
मात्र ही योजना संपण्याआधीच लोकसभा निवडणुकीची आचिरसहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने या योजनेसाठी एक वर्षाचा कालावधी पुन्हा वाढवला आहे. यानुसार आता आर्थिक वर्ष 2024-25 अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत गॅस सिलेंडर वर 300 रुपये सबसिडी पात्र नागरिकांना मिळणार आहे.
मार्च अखेरीस कांद्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या संपूर्ण राज्यातील दर
म्हणजे आता उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणारी तीनशे रुपये सबसिडी पुढील आर्थिक वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये वाढवण्यात आला होता. यामध्ये उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसिडी मध्ये शंभर रुपयाची वाढ करण्यात आली होती. LPG Gas Cylinder Subsidy
या अगोदर ही रक्कम दोनशे रुपये एवढी होती. दरम्यान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घरकुल गॅस सिलेंडरच्या गॅस सिलेंडरच्या सबसिडीमध्ये शंभर रुपयाची वाढ करून तीनशे रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने पीएम उज्वल योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, “आता पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी सबसिडी 2024-25 परंतु वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील सुमारे दहा कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर यामुळे सरकारवर बारा हजार कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे.”
1 thought on “नागरिकांसाठी आनंदाची बातमी..! 1 एप्रिल पासून या 10 कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 600 रुपयांत”