Maharashtra Government Scheme | रेशन कार्ड हे गरीब धारकातील नागरिकांना धान्य पुरवण्याचे साधन आहे. गरीब घटकातील लोकांना स्वस्त मध्ये धान्य मिळावं यासाठी शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्ड आता सर्वच योजनांमध्ये एक महत्त्वाची दस्तावेज बनले आहे. तसेच (Maharashtra Government Scheme) महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घटकातील लोकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवल्या जातात.
सध्या वर्तमान मधील शिंदे फडवणी सरकार राज्यातील नागरिकांसाठी अनेक अशा योजना राबवत आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सरकारचे माध्यमातून अनेक असे धडाकेबाज निर्णय घेण्याचे कार्य सुरू आहे. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केल्यापासून राज्यातील नागरिकांसाठी व महिलांसाठी अनेक अशा हिताच्या योजना सुरू केलेले आहेत.
तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून देखील महिलांसाठी अनेक अशा महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. राज्य शासनाच्या माध्यमातून आत्ताच सुरू करण्यात आलेले लेक लाडकी योजना हिचा देखील समावेश होतो. तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब घटकातील मुलींना एक लाख एका हजार रुपये पर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.
हे पण वाचा | मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरणास मान्यता दिली आहे. तसेच यासाठी निधी देखील उपलब्ध केलेला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्य शासनाच्या वतीने पाच मार्च 2024 रोजी लेक लाडकी योजनेसाठी 19 कोटी 70 लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने मान्यता देखील देण्यात आलेली आहे.
हा निधी राज्यातील एकात्मिक बाल विकस सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली असून हा निधी 36 जिल्ह्यांसाठी उपलब्ध केलेला आहे.
ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून 36 जिल्ह्यासाठी राबवली जात आहे जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर नियोजन आयोजित करून या योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुली या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे. म्हणजे एक एप्रिल 2023. नंतर जन्मला आलेल्या मुलींना लाभ मिळणार आहे. जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधावी लागणार आहे.
परंतु तुम्हाला या योजनेमध्ये कसा लाभ घेता येईल याबद्दल आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहेत व या युनिचा कोणत्या कुटुंबातील मुलींना लाभ मिळणार आहे ती ते सुद्धा आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.
या कुटुंबातील मुलींना मिळणार लाभ
या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मला आलेले पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकातील कुटुंबाच्या मुलींना दिला जाणार आहे कुटुंबातील एक व अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
समजा तुमच्या कुटुंबामध्ये एक मुलगी अथवा एक मुलगा असल्यास ही योजना लागू राहणार आहे. ज्याच्या कुटुंबामध्ये एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल त्याच कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
1 thought on “राज्यातील ‘या’ रेशन कार्ड धारकाच्या मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये तुमचे यादीत नाव आहे का पहा”