पावसाचा कहर पुन्हा सुरू! महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोकण, मुंबई धोक्याच्या झोनमध्ये!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात थोडा थांबलेला पाऊस पुन्हा एकदा जोमात परतताना दिसतोय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होत आहे. विशेषतः पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Monsoon Update

बुधवारी रात्री पुणे शहर आणि कोकणातील काही भागात ढगफुटीसारख्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला, मात्र हवामानाचा हा बदलेला स्वभाव काहीसा धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा अनेक भागांना देण्यात आला आहे.

हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पडणाऱ्या या पावसाचा परिणाम म्हणजे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून, पाटबंधारे विभागाने रात्री १२ पासून ६४५१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. हा विसर्ग पावसाच्या प्रमाणानुसार बदलत जाणार आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, ६ जुलैपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अधिक जोमात सक्रिय होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पावसाची टंचाई जाणवत असतानाच, ६ जुल्यानंतर तिकडेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, काही भागांत ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आतुरतेने पावसाची वाट पाहिली आहे. त्यामुळे हा पाऊस तिथल्या शेतीसाठी वरदान ठरू शकतो.

हे पण वाचा | राज्यात धो–धो पाऊस होणार का पुन्हा लागणार ब्रेक? या तारखेपासून हवामानात होणार मोठा बदल..

पुण्यात धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्यात माती, गाळ मिसळल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली आहे. अनेक नागरिकांनी पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. महापालिकेने जलशुद्धीकरणाची प्रक्रिया वेगात सुरू केली असून, प्रशासनाने नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून प्यायचं आवाहन केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण क्षेत्रात संततधार सुरु आहे आणि २१३३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात चांगली सुरुवात झाली असून, सध्या हे धरण ६६.४९ टक्के भरलं आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईच्या संकटावर काही अंशी मात होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण परिस्थितीकडे पाहिलं, तर पावसाच्या या फेरीमुळे एकीकडे काही भागांना दिलासा मिळणार असला तरी, कोकण व घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेची गरज आहे. जलस्तर वाढणं, पुराचा धोका आणि पाण्याच्या शुद्धतेसंबंधी अडचणी यांच्यावर वेळेवर उपाययोजना करणं गरजेचं ठरणार आहे.

Disclaimer:

वरील माहिती ही विविध विश्वसनीय माध्यमांतून, हवामान विभागाच्या अहवालांवर आधारित असून, ती सामान्य जनतेच्या माहितीकरिता दिली आहे. हवामानात क्षणाक्षणाला बदल होऊ शकतो, त्यामुळे स्थानिक प्रशासन किंवा अधिकृत हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment