Panjabrao Dakh: मे महिन्याची सुरुवातच यंदा काहीशी वेगळी झाली. सामान्यतः उन्हाने होरपळून टाकणारा मे, यंदा मात्र धुवांधार पावसाच्या तडाख्याने सुरू झाला. महाराष्ट्रात एकीकडे विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडवून दिली, तर दुसरीकडे याच पावसामुळे भात पेरणीचे स्वप्न रंगू लागले. यावर्षी मान्सूनचा लवकर प्रवेश झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान अंदाज म्हटलं की नाव समोर येतं पंजाबराव डख यांचं.
डख साहेबांचा अंदाज एवढा अचूक का असतो?
पंजाबराव डख एक नाव जे शेतकऱ्यांमध्ये अढळ स्थान मिळवून बसलंय. त्यांच्या अंदाजामागे ना फक्त विज्ञान आहे, तर आहे अनुभव, निसर्ग निरीक्षण आणि पिढ्यानपिढ्यांचं पारंपरिक ज्ञान. एका खास मुलाखतीत पंजाबरावांनी सांगितलं की, “मी आठवीत असताना म्हणजे 1995 पासूनच पावसाचं आणि निसर्गाचं निरीक्षण करतोय. माझे आजोबा आणि वडील हे दोघेही निसर्गाकडून पावसाचे संकेत घेत असत. तिथूनच ही रुची मनात रुजली.”
डख साहेबांचे हवामान अंदाज फक्त सॅटेलाईटवर नाही तर ढगांचे रंग, वाऱ्याची दिशा, पशुपक्ष्यांचे वर्तन, चिमण्यांची आंघोळ, सरड्याचा रंग, घराच्या दिव्याभोवती जमा होणारे किडे, जांभूळ, गावरान आंबा, निंब यांच्यातील मोहर अशा असंख्य संकेतांवर आधारित असतात. Panjabrao Dakh
जून ते नोव्हेंबर असा असेल यंदाचा पाऊस
जून: सुरुवातीला उष्णता, नंतर दमदार पाऊस डख साहेब म्हणतात, “1 ते 7 जूनदरम्यान राज्यात उष्णता राहील. पण 8 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल. खरीप हंगामासाठी 13 ते 28 जून हा कालावधी उत्तम आहे. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल.”
जुलै: पिकांच्या वाढीस पोषक पाऊस
जुलै महिन्यात देखील पावसाचं प्रमाण चांगलं राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भात, सोयाबीन, मका, उडीद, मूग या सर्व पिकांसाठी हा महिना खूप फायदेशीर ठरेल.
हे पण वाचा | Today’s Horoscope: आज या राशींवर शनीदेवाची कृपा होणार; वाचा आजचे तुमचे राशिभविष्य
ऑगस्ट आणि सप्टेंबर: धरणं भरवणारा काळ
डख साहेबांच्या अंदाजानुसार, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. यामुळे धरणांची पातळी वाढेल आणि पाणीटंचाई टळेल.
परतीचा पाऊस: रब्बीसाठी वरदान
सप्टेंबर संपल्यानंतर मान्सूनचा परतीचा टप्पा सुरू होतो. या टप्प्यात देखील चांगला पाऊस होईल. त्यामुळे हरभरा, गहू, मका यांसारख्या रब्बी पिकांसाठी भरपूर ओलावा मिळेल. साधारण 2 नोव्हेंबरनंतर थंडीचा सुरुवात होईल, असं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला
डख साहेबांनी शेतकऱ्यांना विशेष सूचना दिली – “जमिनीत पुरेसा ओलावा म्हणजे किमान एक फूट ओल असेल तेव्हाच पेरणी करावी. घाई केल्यास दुबार पेरणीचा धोका संभवतो. 13 जूननंतरचा कालावधी अधिक योग्य आहे.”
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, यंदा सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे जमिनीची ओल चांगली आहे. त्यामुळे दुबार पेरणीची शक्यता फारच कमी आहे, जे शेतकऱ्यांसाठी मोठं आश्वासन ठरतं.
‘पारंपरिक ज्ञान आणि निसर्ग निरीक्षण’ – विज्ञानाला पूरक
डख साहेब म्हणतात, “मी स्वतः शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांच्या भावना समजतात. माझे अंदाज हे उपग्रहावर अवलंबून नसून, निसर्गाच्या सूक्ष्म बदलांवर आधारित असतात. सरड्याचा रंग, झाडांना येणारी फळं, चिमण्यांचं वर्तन – हे सगळं काहीतरी सांगतं.”
उदाहरणार्थ, गावरान आंब्याला जर खूप फळं लागली, तर तो दुष्काळाचं संकेत देतो, तर कमी मोहर म्हणजे चांगला पाऊस. हे संकेत पिढ्यानपिढ्या अनुभवावरून आलेले आहेत.
निसर्गचक्र बदलाचं वास्तव
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलं, “ऋतुचक्र आता सुमारे 22 दिवस पुढे सरकलंय. मान्सून लवकर येतोय, थंडी उशिरा येतेय. अशा बदलत्या हवामानात पारंपरिक पंचांग, स्थानिक निरीक्षण आणि आधुनिक हवामान तंत्रज्ञान यांचा योग्य ताळमेळ शेतकऱ्यांना ठेवावा लागेल.”
शेतकऱ्याचं आयुष्य हे आभाळाकडे डोळे लावून वाट पाहणाऱ्या माणसाचं असतं. पण पंजाबराव डखसारखे हवामान अभ्यासक त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने आणि अनुभवाने या वाट पाहण्याला दिशा देतात. त्यांचा हा अंदाज केवळ आकडेवारी नाही, तर एक शेतकऱ्याच्या भावविश्वातील आशेचा किरण आहे. यंदा पावसाने खरोखर साथ दिली, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाची हसू उमटेल… आणि त्याच्या काळ्या मातीत हिरवाई फुलू लागेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?”