राज्यामध्ये 15,631 पोलीस भरती सुरू, या ठिकाणाहून एका क्लिकमध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Recruitment 2025 | राज्यभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि भरती प्रक्रियाचे अनेक दिवसापासून वाट पाहत असाल तर तुमची आता प्रतीक्षा संपणार आहे कारण शासनाने भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. राज्यामध्ये जवळपास 15,631 पदांची पोलीस भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात रिक्त होणारे पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई, अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नव्हती. तर आता त्या संदर्भात मोठी अपडेट आली असून लवकरच आता आज पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही आवश्यक अटी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये उमेदवारांना योग्य कागदपत्र द्यायचे आहेत. तर एका पदासाठी उमेदवाराशी एक जिल्हा एकमेव अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते अर्ज बाद ठरणार आहेत. मैदानी चाचणीत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी 10 जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या मिरीटनुसार उमेदवारांची पोलीस दलामध्ये निवड होणार आहे.

राज्यामध्ये पोलिसांची रिक्त पदे

पोलीस शिपाई या पदासाठी 12,399, चालक शिपाई 234, सशस्त्र पोलीस शिपाई 2393, कारागृह शिपाई 580, बँड्समन 25 असे मिळून एकूण 15631 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळेमध्ये अर्ज करायचा आणि योग्य प्रकारे अर्ज सादर करायचा आहे जेणेकरून कुठलाही अडचणीला सामोरे यावे लागणार नाही.

अर्ज करण्यासाठी या ठिकाणाहून अर्ज करा

पोलीस भरती उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी खालील दिलेल्या बटनावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपयांचे शुल्क असणार आहे.

हे पण वाचा | पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज  या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!

Leave a Comment