पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज  या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update | सध्या राज्यभर पावसाने थोडी उसंत घेतलेली असतानाच शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्यात. काही भागांमध्ये पहिल्या पावसानंतर पेरण्या पार पूर्ण झाल्यात, पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवलीय. कुठं फारसा पाऊस नाही, तर कुठं मोजकाच. परिणामी पेरलेल्या बियाण्यांचं काय होईल, दुबार पेरणी करावी लागेल का, अशी धाकधूक शेतकऱ्यांना सतावत आहे.Maharashtra Weather Update

हे पण वाचा | Maharashtra Rain Forecast: राज्यातील या 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट; या भागात होणार अतिमुसळधार पाऊस

कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये मात्र अजूनही पावसाची हलकीशी हजेरी लागत असली, तरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे. विशेषतः धुळे आणि नाशिक भागांमध्ये आज (१४ जुलै) वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय.

या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज १४ जुलै रोजी एक नवा अंदाज वर्तवला असून, त्यामुळं शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळतोय.

डख म्हणतात की, १४ आणि १५ जुलै हे दोन दिवस काही ठिकाणी भाग बदलत, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे. परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

Maharashtra Rain Forecast: राज्यातील या 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट; या भागात होणार अतिमुसळधार पाऊस

हे प्रमाण फार मोठं नसलं, तरी पिकांना ‘जीवदान’ देणारं असेल, असं त्यांनी सांगितलं. अर्थात, हा पाऊस सगळीकडे एकसारखा आणि सातत्याने पडणार नाही.

पण शेतकऱ्यांना खरी आशा देणारी गोष्ट म्हणजे डखांचा मोठा अंदाज  त्यांनी स्पष्ट केलं आहे की, “जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे २७, २८ आणि २९ जुलै या तारखांना संपूर्ण राज्यभर धुवांधार पावसाची शक्यता आहे.”

डखांनी सांगितलं की, १८ जुलयानंतर आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये चांगला पाऊस पडणार असून, याचा परिणाम सीमेलगत असलेल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांवरही होईल. त्यामुळे नांदेड, लातूर, बिलोली, अक्कलकोट, उदगीर, नायगाव या भागांमध्ये पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

२२ जुलयानंतर हवामानात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि त्यानंतर २७ ते २९ जुलैदरम्यान संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचं आगमन होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं.

त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत पेरणी केलीय, त्यांनी अजून थोडं संयम ठेवावा. पिकांवर पाण्याची गरज भासेल, तिथं ही १४-१५ जुलैच्या पावसाची फवारणी उपयोगी ठरेल. आणि ज्यांना दुबार पेरणीचा विचार डोक्यात आहे, त्यांनीही हा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

एकूणच काय, तर सध्या पावसाने थोडी उसंत दिली असली, तरी जुलैच्या अखेरीस राज्यात मुसळधार पावसाची हमी आहे, असं पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे.

Disclaimer:

वरील हवामान अंदाज ही माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक, हवामान खात्याचे अंदाज आणि मिडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. या अंदाजावरून शेतीविषयक कोणताही अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक कृषी अधिकारी, हवामान तज्ज्ञ यांचा सल्ला अवश्य घ्यावा. हवामानात तात्काळ बदल होऊ शकतो, त्यामुळे वाचकांनी आपल्या जबाबदारीने निर्णय घ्यावा.

हे पण वाचा | मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..

1 thought on “पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज  या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!”

Leave a Comment

error: Content is protected !!