Maharashtra Rain : सप्टेंबर मध्ये पावसाने राज्यभर हजेरी लावली होती, त्या मोठ्या संकटातून शेतकरी सावरलेला आहे. परंतु आता पुन्हा एकदा हवामान खात्याची अपडेट शेतकऱ्यांना पुन्हा फटका देणार का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 15 ऑक्टोबर रोजी म्हणजे काल राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. तर पुन्हा एकदा 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. चला तर जाणून घेऊया नवीन अंदाज. Maharashtra Rain
हवामान खात्याचा नवीन अंदाज
राज्यामध्ये आधी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी पार खरडून गेलेले आहेत. पिकांसोबत जमिनीची सुद्धा माती वाहून गेली अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना राज्यात वला दुष्काळ जाहीर करावा व मोठे प्रमाणात मदत द्यावी अशी मागणी होत होती. तर काही ठिकाणी जास्ती पाऊस झाल्याने खरीप हंगामामध्ये पूर्ण पिक वाया गेल आहे. तर शेतकऱ्यांमधून रब्बी हंगामावरती जोर द्यायला सुरुवात झाली आहे. परंतु ऑक्टोबर चा दुसरा आठवडा सुरू होताच राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 15 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि जवळपास नरक चतुर्दशी पावसाची शक्यता आहे.
16 ऑक्टोबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, अमरावती, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
17 ऑक्टोबर रोजी राज्यातील बुलढाणा, सोलापूर, धुळे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, हिंगोली
18 ऑक्टोबर रोजी राज्यातील अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे
19 ऑक्टोबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्या नगर, जालना, बीड, नाशिक, लातूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता.
20 ऑक्टोबर रोजी राज्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा | Weather Alert | राज्याच्या वातावरण पुन्हा एकदा मोठा बदल, हवामान खात्याचा या 21 जिल्ह्यांना अलर्ट