Maharashtra SSC HSC Exam 2026 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला होणार बोर्डाचे पेपर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra SSC HSC Exam 2026 : राज्यातील लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2026 सालच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. दरवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये तयारीला वेग आला असून, अधिकृत वेळापत्रक केव्हाही प्रसिद्ध होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. Maharashtra SSC HSC Exam 2026

गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली होती तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. त्या परीक्षा ही पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर परीक्षा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता थांबून न राहता अभ्यासाची गती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे शिक्षणतज्ञ सांगतात.

बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थी वेळापत्रक पाहू व डाऊनलोड करू शकतील. त्यासाठी संकेतस्थळावर गेल्यावर SSC/ HSC Datesheet 2026 हा लिंक उपलब्ध होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करून विद्यार्थी आपल्या अभ्यासाचा नियोजन करू शकणार आहेत.

मागच्या वर्षी आकडेवारीनुसार राज्यभरातून तब्बल 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यात विज्ञान शाखेत 7.60 लाख, कला शाखेत 3.81 लाख आणि वाणिज्य शाखेत 3.29 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदाही तितक्याच संख्येने किंवा त्याहूनही जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी काही अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध असतात. ती म्हणजे mahresulte.nic.in, msbsse.co.in या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्याची माहिती अपडेट केली जाणार आहे.

एकंदरीतच माहिती पाहता फेब्रुवारी महिन्यात परीक्षा असणार आहे हे असं वाटतंय पण अधिकृत वेळापत्रक आले की तयारीला वेग येतो. आता दिवाळीनंतर काळच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष घालायचं मोबाईल बाजूला ठेवायचा आणि नियमित प्रोलोकन सुरू करायचं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे 2026 सालच्या दहावी आणि बारावी परीक्षांसाठी राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बोर्डाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होताच विद्यार्थ्यांना दिशा मिळेल, पण तोपर्यंत परीक्षा लांबत आहेत, अजून वेळ आहे या ब्रह्मात न राहता सातत्याने अभ्यास करून हीच खरी गुरुकिल्ली असल्याच शिक्षक सांगत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!