Maharashtra women scheme 2025 | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली आहे. या योजनेचे माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस पडताळणी केली नव्हती त्यामुळे अनेक बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे . हे लक्षात आल्यानंतर आता सरकारने या योजनेअंतर्गत कठोर पडताळणी सुरू केली आहे व या पडताळणी दरम्यान अनेक महिला लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
सप्टेंबर महिना सुरू झाला असून, गणपती विसर्जनाला अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे व थोडे दिवस राहिले आहे पण अजून देखील महिलांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही. आता शहरात असो किंवा खेड्यापाड्यात असो महिलांमध्ये एकच चर्चा सुरू आहे ? की तुझ्या खात्यात आले का 1500 ! पण सगळ्यांचा एकच सवाल आहे हप्ता कधी येणार ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होतात. पण यावेळी थोडा उशीर झाला आणि त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे अनेक महिला असे म्हणतात की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे पण अद्याप यावर अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता !
यामध्ये महत्त्वाचं म्हणजे, अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणारच नाही. याची एक मुख्य आणि मोठे कारण म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांची नव्याने पडताळणी सुरू केली आहे राज्यांमध्ये तब्बल 26 लाख महिलांनी अर्ज भरता वेळेस निकषा बाहेर जाऊन अर्ज केला होता. आणि याच कारणामुळे आता या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे व या महिलांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
घरोघरी जाऊन होणार लाडक्या बहिणींची तपासणी
ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, आता अंगणवाडी सेविका, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. अंगणवाडी का घरोघरी जाऊन घरात कोणी टॅक्स भरतं का ? घराचं वार्षिक उत्पन्न किती आहे घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का ? या महिलाच्या नावावर जमीन आणि वाहन तर नाही ना ? असे अनेक प्रश्न अंगणवाडी सेविका पात्र लाभार्थी महिलेंना विचारणार आहे.
हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
सरकारने देखील या महिलांविरोधात थेट कारवाई करणार असे आदेश देखील दिले आहे. व अशा महिलांचे अर्ज देखील बात केले जाणार आहेत त्यांना यापुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही , आत्ताच एक प्रकरण उघड आला आहे ज्यामध्ये 1929 नोकरदार महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अर्ज भरून सरकारकडून पैसे उकळले आहेत, हे प्रकरण नागपूर मध्ये घडले आहे .
Disclaimer :
आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती विविध प्रसार माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून , गोळा करून सादर केली आहे. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी असून याचा हेतू कुठल्याही व्यक्ती संस्था किंवा योजनेची बदनामी करणे किंवा इतर कोणताही उद्दिष्ट नाही.