Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत महिलांना दिली जात आहे. या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्यापर्यंत लाभ मिळाला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजून मिळाला नसल्यामुळे महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ऑक्टोबर महिन्याचा आता कधी मिळणार?
ऑक्टोबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील थोडा उशिरा मिळू शकतो. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने यावेळी उशीर न करता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करावा. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक अडचणीमुळे उशिरा मिळाला होता. मात्र आता सर्व काही सुरळीत असल्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाऊ शकतो.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार! या दिवशी मिळणार ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा अनेक जणांनी गैरफायदा घेत यामध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी रोखण्यासाठी आणि या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी महिलांना दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा केवायसी करण्यास सुरुवात केली जाईल अशी माहिती मिळाली आहे.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवायसी न केलेल्या महिलांचे पुढील हप्ते रोखले जाणार नाहीत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या केवायसी केलेले असो किंवा नसो अशा सर्व महिलांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर निवडणुका संपताच महिलांना केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. कारण तिथून पुढील हप्ते केवायसी केल्याशिवाय महिलांच्या खात्यात जमा होऊ शकणार नाहीत. Mazi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता निकष
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- त्या महिलेचे वय सरकारने ठरवलेल्या मर्यादित असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- इतर कोणत्याही राज्य सरकारी योजनेतून आर्थिक लाभ घेत नसावा.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत मिळाली आहे. काही महिलांनी या लाभातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अनेक गोरगरीब महिला या योजनेच्या लाभातून आपला घर खर्च, मुलांची फीस, मेडिकल अशा जीवनावश्यक गोष्टी खरेदी करत आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या लाभ महिलांसाठी खरंच खूप मोलाची भूमिका बजावत आहे.
