Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गोरगरीब महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या पैशातून महिला त्यांचा घर खर्च, मुलांच्या शाळेची फीस, औषध उपचार आणि रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोग करतात. मात्र ऑक्टोबर महिना संपूनही अनेक महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑक्टोबर महिना संपला असून देखील महिलांना या महिन्याचा हप्ता मिळाला नसल्यामुळे महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे. तो म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक महिला बँकेत जाऊन आपल्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही? हे तपासत आहेत. मोबाईलवर संदेश मिळाला का? याचे देखील चौकशी केली जात आहे. मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांना उशिरा मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रशासन निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया काही प्रमाणात लांबू शकते. Mazi Ladki Bahin Yojana
नोव्हेंबर महिन्यात तीन हजार मिळू शकतात
राज्यभरात सध्या एकच चर्चा सुरू आहेत ती म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार का? जर असं खरंच झालं तर महिलांना नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल एकत्रित तीन हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिळालेले माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात सरकारकडून महिलांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. कारण डिसेंबर पासून जिल्हा परिषद नगरपरिषद आणि महानगरपालिका च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू केली जाणार आहे. आचारसंहितेमध्ये कोणत्याही सरकारी योजनेचा निधी वितरित केला जात नाही. त्यामुळे सरकार निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात हफ्ता जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडक्या बहिणींचा सवाल?
लाडक्या बहिणींकडून सरकारवर असा आरोप केला जात आहे की, सरकारने दिलेली मदत खरच खूप महत्त्वाची ठरत आहे. मात्र सरकारने दरमहा लाभ देण्याचे वचन दिले होते पण वेळेवर पैसे कधीच मिळत नाहीत. लाडक्या बहिणींना या निधीची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा सरकारकडून हा हप्ता न देता उशिरा महिलांच्या खात्यात जमा केला जातो. असा आरोप केला जात आहे. हा हप्ता महिलांना कधी मिळणार याबाबत अधिकृत घोषणापत्र आले नसले तरी प्रशासनातील काही अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार निधी तयार आहे. आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. तांत्रिक पडताळणी आणि बँक प्रक्रियेत अडचण निर्माण झाल्यामुळे थोडा उशीर झाला आहे.
 
					 
		